बुरडे यांचे प्रतिपादन : पालांदूर येथे परमात्मा एक सेवक संमेलनपालांदूर : मनुष्यांना आयुष्यात सुखी, समृद्ध व्हायचे असल्यास त्यांनी तत्व, शब्द व नियमांचे काटेकोर पालन करावे, यामुळे आयुष्यात दु:ख किंवा द्वेश मनात येणार नाही. असे प्रतिपादन आध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे यांनी केले. पालांदुरात मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व सामूहिक हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या मंचावर यशवंत ढबाले, डॉ.अजय तुमसरे, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, विजय कापसे, वर्षा रामटेके, दामाजी खंडाईत, तुळशीराम भुसारी, उपसरपंच ईश्वर तलमले, हेमराज कापसे, दिलीप सांदेकर, देवराम उरकुडे, नरेश बोरकर, पुरुषोत्तम भुसारी, बळीराम चोपकर आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना बुरडे यांनी परमपूज्य परमात्मा बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना बाबांच्या आचारसंहितेचा जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले. देवराम उरकुंडे यांनी बाबांचे विचार सर्वांनी काटेकोरपणे अमलात आणण्याची गरज आहे. शब्द, तत्व व नियमाने पुढे गेल्यास आयुष्याची फलश्रूती होईल. पती पत्नी दोन्ही सुखी संसाराचे चाक आहेत. कुटुंबात शब्दांचा वापर जपून केल्यास कौटुंबिक वातावरण सुखी, समृद्धी राहाते. दरम्यान कार्यक्रमासाठी भल्या पहाटेपासून सेवकांनी गावात हजेरी लावली. गावातील प्रमुख रस्त्यांवर सळा टाकून रांगोळ्यांनी सुशोभीत करण्यात आले होते. गावातून ट्रॅक्टरद्वारे मिरवणूक काढून कार्यक्रमाची जागृती करण्यात आली. देवराम उरकुडे यांच्या निवासस्थानी होम हवनाचा कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांचेही समायोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराम उरकुडे, संचालन उत्तम भुसारी, आभार दिलीप चौबे यांनी मानले. कार्यक्रमाला पुरुषोत्तम भुसारी, महेश उरकुडे, वासुदेव काटेखाये, दिलीप राऊत, टिकाराम भुसारी, रविंद्र पराते, विनायक नंदुरकर, अंताराम भुसारी यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
सुखी आयुष्यासाठी नियम पाळा
By admin | Updated: December 10, 2015 00:53 IST