शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

विश्वशांतीसाठी पंचशील तत्त्वाचे पालन व्हावे

By admin | Updated: February 9, 2016 00:37 IST

आज जगाने पंचशील तत्वाचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. आज येथे प्रार्थना करण्यासाठी आलो नाही,...

भदंत योको निशिओका यांचे प्रतिपादन : महासमाधिभूमी महास्तूप येथे धम्म महोत्सव, बौद्ध बांधवांची अलोट गर्दीपवनी : आज जगाने पंचशील तत्वाचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. आज येथे प्रार्थना करण्यासाठी आलो नाही, तर येथे पंचशील तत्वाचे पालन कसे होत आहे हे पाहण्यासाठी आलो आहोत. पंचशील तत्वाचे सदैव पालन करावे. पंचशील तऱ्वाचे पालन केल्यामुळे आपसातील जीवन मैत्रीमय होईल. विश्वात शांती प्रस्थापित होण्याकरिता पंचशील तत्वाचे पालन होण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन तेंदाई संघ जपानचे माजी अध्यक्ष योको निशिओका यांनी केले.पञ्ञा मेत्ता संघ द्वारा रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधीभूमी महास्तूप येथे आयोजित २९ व्या धम्ममहोत्सवात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष धम्मदूत भदंत संघरत्न मानके तर उद्घाटक अ.भा. भिक्खू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थवीर होते. भदंत सदानंद महास्थवीर यांनी उपासकांनी बौद्ध धम्माचे विचार अनुसरावे. त्यामुळे त्यांचे जीवन मंगलमय होईल. संघरत्न मानके यांनी सर्वांच्या सहकार्यातून येथील आंतरराष्ट्रीय स्तराचा महास्तुपाची निर्मिती झाली आहे. हा महास्तूप जपान, भारत देशाचा मैत्रीचा प्रतिक ठरला आहे.याप्रसंगी जपानचे इचिगुओ तेरासू उन्दो तेंदाई संघ जपानचे अध्यक्ष भदंत शोताई योकोयामा, भदंत खोशो तानी, भदंत योको निशिओका, भदंत ए.यू. मुरारवामी, भदंत शोंझे आराही, भदंत झेनी ओच्छुका, भदंत खोदो कोंदो, आ. जोगेंद्र कवाडे, आ.रामचंद्र अवसरे, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, डॉ.बालचंद्र खांडेकर, जपानचे भदंत म्योंका सैदा, भदंत म्योचिन्कु नागाकुला, उपासिका हिदेको कावासाकी, उपासक योशियो फउकाया, डॉ.आसामी सासकी, उपासक नोबुआकी हिराताजी, भदंत सत्यशिल, डॉ.भदंत ज्ञानदीप, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रचारक नागदिपांकर, ज्येष्ठ विचारवंत ताराचंद खांडेकर, रुयाडच्या सरपंच कविता मोटघरे, सिंदपुरीच्या सरपंच प्रमोदिनी खोब्रागडे, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई आदी प्रमुख अतिथी होते.पवनी शहरात आगमन होताच देश विदेशातील भिक्खूने स्वागत करून रॅली काढण्यासाठी रुयाडच्या सम्राट अशोक बुद्धविहारातून सिंदपुरीच्या बौद्धविहार होऊन महासमाधीभूमी महास्तुपापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. महास्तुपात भारतीय, जपानी, तिबेटी पद्धतीने बौद्ध पूजा करण्यात आली. मुख्य समारंभात भदंत नागदिपांकर यांना भदंत संघरत्न मानके व भदंत खोशोांनी यांच्या हस्ते व जपानच्या भिक्खूनी म्योजो रासाकी यांना भदंत सदानंद यांच्या हस्ते पञ्ञा पीठक व उपासक मधुकर गजभिये यांना भदंत संघरत्न माणके यांच्या हस्ते मेत्ता पिठक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पञ्ञा मेत्ता बालसदन, पञ्ञा मेत्ता स्कुल, मिलिंद बहुउद्देशिय विकास मंडळ, सिरोंचा च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन नृत्य प्रस्तूत केले. मधल्या वेळात पूर्व न्यायाधीश अ‍ॅड.महेंद्र गोस्वामी यांनी एकपात्री नाटक सादर केले. प्रास्ताविक धम्मानंद मेश्राम, संचालन अ‍ॅड.महेंद्र गोस्वामी व आभार प्रदर्शन लोमेश सूर्यवंशी यांनी केले. सकाळपासूनच बौद्ध उपासक, उपासिका पांढरे कपडे परिधान कार्यक्रमात होण्याकरिता येत होते. दुपारपर्यंत ही संख्या दोन लाखांवर गेली. संपूर्ण वातावरण बौद्धमय झाले होते. कार्यक्रमााकरिता मनोहर मेश्राम ब्रम्ही, शीलरत्न कवाडे, जयराज नाईक, बाबूराव वाघमारे, राजकुमार वंजारी, गजेंद्र गजभिये, जयसर दहिवले, देवचंद बन्सोड, करुणा टेंभुर्णे, सुमित ढाले, पंकज गोंडाने, संघर्ष कांबळे, पंकज सोमकुवर, स्वप्नील टाले, चेतन गजभिये, सचिन पोटपोसे, रमेश मोटघरे, शिलमंजू सिंहगडे आदींनी सहकार्य केले. (तालुका /शहर प्रतिनिधी)