नाना पटोले यांची पंतप्रधानांना मागणीभंडारा : शेतकऱ्यांचे किमान दैनिक उत्पन्न निश्चित करण्यात यावे, अशी मागणी खासदार नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे.महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच विविध कारणांमुळे नुकसान होत असते. याशिवाय शेतकऱ्यांना पिकांचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. या कारणांमुळे शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करण्यासाठी भाग पडतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांचे किमान दैनिक उत्पन्न निश्चित करण्यात यावे, जेणेकरून शेतकरी दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील. यासह शेतकऱ्यांचा सामजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासही होऊ शकेल, असे खासदार नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शेतकरी वंचितभंडारा : जिल्ह्यात खरीप हंगामात निसर्गाची अवकृपा झाली. अनेक शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला. शासकीय स्तरावरून त्यांना आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. शासकीय यंत्रणेमुळे नुकसानीचा अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठविला. मात्र यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळालेला नसल्याने अजूनही शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांचे किमान दैनिक उत्पन्न निश्चित करा
By admin | Updated: February 4, 2017 00:23 IST