शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेत पाच जणांनी घेतली उडी; दोघे बचावले, एकाचा मृत्यू तर दोन बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका तरुणाने उडी घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र रात्री अंधार असल्याने शोध घेता आला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरू होती. वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाजवळ शोधमोहीम सुरू असताना ३० वयोगटातील दोन तरुणांनी वैनगंगेच्या लहान पुलावरून उडी घेतली. हा प्रकार बचाव पथकातील पोलिसांना दिसला. त्यांनी तत्काळ तिकडे बोट वळवून या दोघांना बाहेर काढले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराची जीवनदायी असलेली वैनगंगा अलीकडे सुसाईड पाॅइंट झाली असून दोन दिवसात वैनगंगेत पाच जणांनी उडी घेतली. दोघांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. तर एकाचा मृत्यू झाला. दोघांचा शोध गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका तरुणाने उडी घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र रात्री अंधार असल्याने शोध घेता आला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरू होती. वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाजवळ शोधमोहीम सुरू असताना ३० वयोगटातील दोन तरुणांनी वैनगंगेच्या लहान पुलावरून उडी घेतली. हा प्रकार बचाव पथकातील पोलिसांना दिसला. त्यांनी तत्काळ तिकडे बोट वळवून या दोघांना बाहेर काढले.दरम्यान, बुधवारी रात्री पुन्हा एका तरुणाने वैनगंगेत उडी घेतली. तर गुरुवारी सकाळी एका तरुणाने मोठ्या पुलावरून उडी घेतली. शोधमोहीम सुरू असताना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. राहुल वामन तायडे (३०) रा. पिंपळगाव, ता. लाखनी असे मृताचे नाव आहे. त्याने मंगळवारी रात्री उडी घेतली होती. मोटारसायकल पुलाजवळ ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. नेमकी त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र कळू शकले नाही. भंडारा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

किराणा व्यावसायिक व लाँड्रीचालक बचावले- येथील सहकारनगरातील ३० वर्षीय किराणा व्यावसायिक आणि तकिया वाॅर्डातील हनुमान नगरातील लाँड्रीचालकाने बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता वैनगंगेच्या लहान पुलावरून आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. त्याच वेळी एका बेपत्ता तरुणाची शोधमोहीम सुरू होती. बोटीत असलेले भंडारा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, पोलीस नायक नागोसे आणि जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्य सीताराम कोल्हे, अमरसिंह रंगारी, अशोक देवगडे यांना हा प्रकार दिसला. त्यांनी तत्काळ तरुणांनी उडी टाकलेल्या ठिकाणी बोट वळविली. या दोघांनाही महत्प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणाने वैनगंगेत उडी घेतली होती हे मात्र कळू शकले नाही. भंडारा शहरचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांनी या दोघा तरुणांना समज देऊन घरी रवाना केले. दरम्यान, बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता. त्यांची नावेही कळू शकली नाही.

 

टॅग्स :Policeपोलिसriverनदी