साकोली : येथील पंचायत समितीत मागील महिन्यात उघडकीस आलेल्या बहुचर्चीत मग्रारोहयो आॅनलाईन घोटाळ्या प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण उजेडात आल्यानंतर साकोली पोलिसांनी या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अल्का लोथे व प्रशांत उसगावकर यांना अटक केली होती तर सहआरोपी असलेल्या रूपेश भैसारी (३२), विशाल केरझरे (२९), चेतन मडावी (२२), महादेव उईके (३२) सर्व रा. साकोली व राहूल राऊत (३२) रा. सेंदुरवाफा या पाच जणांची चौकशी करून त्यांना सोडून दिले. ६ एप्रिल रोजी या पाचही जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांना साकोली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी असलेल्या अल्का लोथे हिचे दोन खाते सील करण्यात आले आहे तर प्रशांत उसगावकर याने खरेदी केलेला प्लॉट व दुसऱ्याच्या नावे घेतलेला प्लॉट अशी १५ लाखांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात आणखी काही नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
आणखी पाच आरोपींना अटक
By admin | Updated: April 10, 2015 00:39 IST