गोसे प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:01:07+5:30

पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. यात गोसेचा प्रकल्पीय एकुण पाणीसाठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय उपयुक्त जीवंत पाणीसाठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारची जलाशय पातळी २४३.५०० मीटर असून उपयुक्त पाणीसाठा ३६०.५१ दलघमी आहे.

The five doors of the Gose project opened | गोसे प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

गोसे प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

googlenewsNext
ठळक मुद्देपवनीत अतिवृष्टी : कारधात वैनगंगेची पातळी २४३.४९ मीटर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गत दोन दिवसात झालेल्या दमदार पावसाने प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली असून गुरुवारी या प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. ५४८ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान बुधवारी पवनी तालुक्यात ८२.६ मिमी पाऊस कोसळला असून येथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. यात गोसेचा प्रकल्पीय एकुण पाणीसाठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय उपयुक्त जीवंत पाणीसाठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारची जलाशय पातळी २४३.५०० मीटर असून उपयुक्त पाणीसाठा ३६०.५१ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ४८.७० असून आतापर्यंत धरण परिसरात २४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भंडारा शहरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची कारधा येथे गुरुवारी २४३.४९ मीटर पाणीपातळी नोंदविण्यात आली. येथे धोकापातळी २४५.५० मीटर असून इशारा पातळी २४५ मीटर आहे. पाण्याचा विसर्ग ५५५४.०१ क्युमेक्स आहे.
जिल्ह्यातील भंडारा, पवनी, साकोली, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यात बुधवारी दमदार पाऊस बरसला. जिल्ह्यात बुधवारी २२.३ मिमी सरासरी पाऊस कोसळल्याची नोंद घेण्यात आली आहे.

रोवणीला आला वेग
गत दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पंधरा दिवसांपासून रखडलेल्या रोवणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यातील शेत शिवारात रोवणीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे.

Web Title: The five doors of the Gose project opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.