शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

धान घोटाळ्यातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: December 29, 2016 01:57 IST

सन २०१४ मध्ये जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि मोहाडीत राज्य शासनाकडून आधारभूत धान खरेदी केंद्रावर करण्यात

चरण वाघमारेंनी आणले होते प्रकरण उघडकीस : शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना लाभ झाल्याचा आरोप भंडारा : सन २०१४ मध्ये जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि मोहाडीत राज्य शासनाकडून आधारभूत धान खरेदी केंद्रावर करण्यात आलेल्या धान खरेदीत ५ कोटी ७२ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणात जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यासह तिघांना मंगळवारला अटक करण्यात आली होती. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सीआयडीने मंगळवारला तत्कालीन जिल्हा मार्केटींग अधिकारी रमेश ठोसरे, वरिष्ठ सहायक अनिल बोंगिरवार, गोपाल साखरवाडे यांना अटक केली. बुधवारला दुपारी भंडारा प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले. यासंदर्भात सीआयडीचे पोलीस निरीक्षक एच.पी. झिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या आरोपींची सखोल चौकशी करण्यात येईल. आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली परंतु न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी दिली असून २ जानेवारीला त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले. हे प्रकरण तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी उघडकीस आणले होते, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी) २२ जणांकडून केली होती १.५ लाख क्विंटल धान खरेदी या धान घोटाळ्यात २२ आधारभूत खरेदी केंद्राचे संचालक मंडळ दोषी आढळले होते. सीआयडीने केलेल्या तपासात समर्थन मुल्याचा खरेदी अंतर्गत सन २०१४ मध्ये एक-एक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १०० क्विंटल धान खरेदी केले होते. २२ लोकांकडून १ लाख ५० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. चुकारे धनादेशाने देण्यात आले होते. परंतु धनादेशाची पावती आणि धनादेशावरील नावात विसंगती आढळून आली. समर्थन मुल्यावर केलेल्या धान खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांऐवजी व्यापारी आणि आधारभूत धान खरेदी केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांनाच लाभ मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता.