लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील गायमुख परिरातील जंगलात वाघ शिकारप्रकरणी कुख्यात आंतरराष्ट्रीय वाघ तस्कर कुट्टू पारधीसह इतर पाच आरोपींना गुरूवारी तुमसर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाºयांनी तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी २५ हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. वाईल्ड लाईफ अॅक्ट अंतर्गत ही शिक्षा सुनाविण्यात आली.१९८४ पासून कुट्टू पारधी वाघ शिकार प्रकरणात गुंतला असून तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील गायमुख जंगलात सन २०१३ मध्ये वाघाची शिकार कुट्टू पारधी व त्याच्या साथीदारांनी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल केले होते. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय वाघ तस्कर कुट्टू पारधी (३०) रा.बिरली जि. कटंगी, रासलाल पारधी (५०) रा.विरली जि. कटंगी, जल्लू पारधी (४५) रा.लिमा जि. राजनांदगाव, बयनी उर्फ बेनीराम पारधी (४२) रा. लिमा, शालिस पारधीसह इतर चार जणांवर गुन्हा नोंदविला होता. इतर चार जण अद्याप फरार आहेत.गुरूवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यु.एन. पाटील यांच्या न्यायालयात पाचही आरोपीचे साक्ष, बयान घेण्यात आले. दुपारी ४ वाजता न्यायमूर्तींनी शिक्षा सुनाविली. यात कुट्टू पारधीसह पाच आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावास तथा प्रत्येकी २५ हजारांचा दंडाची शिक्षा सुनाविण्यात आली.दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. यापूर्वी कुट्टू पारधी २२ जानेवारी २०१६ ला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशातील लखीमपूर जंगलातून उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली होती. यापूर्वी पवनी येथील न्यायालयाने कुट्टू पारधीला तीन वर्षाची शिक्षा सुनावली होती. सध्या कट्टू पारधी उत्तरप्रदेशातील लखीमपूर तुरूंगात तर त्याचा साथीदार रासलाल पारधी कर्नाटकातील बेळगाव कारागृहात शिक्षा भोगत आहे.
कुट्टू पारधीसह पाच आरोपींना तीन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:44 IST
तुमसर तालुक्यातील गायमुख परिरातील जंगलात वाघ शिकारप्रकरणी कुख्यात आंतरराष्ट्रीय वाघ तस्कर कुट्टू पारधीसह इतर पाच आरोपींना ....
कुट्टू पारधीसह पाच आरोपींना तीन वर्षे कारावास
ठळक मुद्देतुमसर न्यायालयाचा निकाल : गायमुख जंगलात केली होती वाघाची शिकार