भंडारा : दीपोत्सवाच्या तीन दिवसांमध्ये शहरासह जिल्ह्यात प्रचंड आतषबाजी करण्यात आली असुन, यामधून निघालेल्या धुराने आणि शनिवारी दिवसभरातील रिमझिम पावसाने श्वसनचा त्रास वाढला आहे. घसाच्या आजार जडला असून व अस्थमाच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवू लागला आहे. फटाक्यांच्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. या धुराने ब्रांकायटीस, जीव गुदमरणे, अस्थमा, दम लागणे अशा प्रकारणे आजार वाढण्याची शक्यता असून, घशामध्ये इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात झालेल्या आतषबाजीतून निघालेल्या धुराने सल्फर डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड आणि फॉस्फरसचे मोठ्या प्रमाण वाढले आहे. फटाक्यांमधुन निघालेल्या धुरातुन विविध घातक रसायन निघत असून, त्यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा त्रास लहान मुले व वृध्दांना अधिक प्रमाणात होत आहे. फटाक्यातील प्रदूषित धुरामुळे ब्रांकायटीस, रायनाटीस, फॅटींगजायटी या सारखे आजार वाढले असून, रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. या धुराने दम लागणे, छातीत टोचणे, घशात सुज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका, जीव घाबरणे, अॅलजींक खोकला, छातीत खरखर होणे आणि अस्थमा यासारखे विकार होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांच्या श्वसननलिका अत्यंत नाजुक असल्याने त्यांना या घातक धुराने धोका असून कायमस्वरुपी श्वसनाचा आजार जडण्याची शक्यता अधिक आहे. यासोबतच अस्थमाचा त्रास असलेल्यांना फटाक्यांच्या धुरामुळे अस्थम्याचा अॅॅटॅक येण्याची दाट शक्यता असल्याचा धोकाही तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.दमा, अस्थमा व अॅलजींक त्रास असलेल्यांना श्वास फटाक्यांच्या धुरामुळे कोंडल्या गेला आहे. दाट वस्तीत असलेल्या नागरिकांना याचा अधिक त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. (शहर प्रतिनिधी)
फटाक्यांच्या धुरांमुळे श्वास कोंडला!
By admin | Updated: October 26, 2014 22:35 IST