शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

शार्ट सर्किटने आग, भंडारा जिल्हा परिषदेत उडाला गाेंधळ

By युवराज गोमास | Updated: April 25, 2023 16:50 IST

पहिल्या माळ्यावरील घटना : वेळीच स्वीच बंद केल्याने अनर्थ टळला

भंडारा :जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू असतांना अचानक पहिल्या माळ्यांवरील अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षा शेजारील व्हरांड्यात शार्ट सर्किटने आग लागली. यामुळे एकच गाेंधळ उडाला. कर्मचाऱ्यांची वेळीच मुख्य स्वीच बंद केल्याने अनुचीत प्रकार टळला. ही घटना मंगळवारला दुपारी १२:३० वाजताचे दरम्यान घडली.

सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात कुलर व पंखे सुरू झाले आहेत. भंडाराजिल्हा परिषदेतही कुलर, एसी व पंखे दिवसभर सुरू असतात. मंगळवारला कर्मचारी कामात व्यस्त असतांना पहिल्या माळयावर शार्ट शर्कीटने अचानक वायरिंगने पेट घेतला. आग व धुर दिसून येताच कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. लक्षपूर्वक पाहणी केली असता शार्ट शर्किट झाल्याचे दिसून येताच कर्मचाऱ्यांनी धाव घेत मुख्य स्वीच बंद केले. या घटनेत पहिल्या माळ्यावरील विद्युत पुरवठा खंडीत होता. पंखे व कुलर तसेच एसी बंंद पडल्याने उकाडा वाढीस लागला होता. या माळ्यावर बांधकाम विभाग, पशुसंवर्धन, जलसंधारण, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे कार्यालय व अन्य विभागाचे कार्यालये आहेत. दोन तासांनंतर पुरवठा सुरळीत चालू आहे.

पाच वर्षापूर्वी झाले होते शार्ट सर्किट

पाच वर्षापूर्वी याच माळ्यावर असलेल्या बांधकाम विभागात शार्ट सर्किटची घटना घडली होती. त्यानंतर जिल्हा परिषद इमारतीतील जुने वायरिंग बदलविण्यात आले होते. तसेच आग नियंत्रण यंत्रण अधिक सक्षम करण्यात आली होती. परंतु या घटनेने पुन्हा विज पुरवठा व्यवस्थेचे ॲडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :fireआगzpजिल्हा परिषदbhandara-acभंडारा