शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यात केला चार लाखांचा दंड वसूल, तरीही ट्रिपलसीट सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

जानेवारी महिन्यात पोलिसांनी २१२ दुचाकी वाहन चालकांवर ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई करीत ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात १७१, मार्च महिन्यात १२४, एप्रिल महिन्यात २२३, मे १०२, जुन २१९, जुलै १२३, ऑगस्ट १६८, सप्टेंबर १७० तर ऑक्टोबर महिन्यात २२० दुचाकी वाहन चालकांवर ट्रिपल सीट वाहन चालविण्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. या सर्व वाहनधारकांकडून दंड वसूल करुन त्यानंतर असा प्रकार करणार नाही असा सज्जड दमही भरला.

ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यातील स्थिती : एप्रिल, जुलै व ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक कारवाई

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात वाहतुक व्यवस्था दुरुस्त करुन नियमीत व्यवस्था लागू करावी असा वाहतुक शाखा प्रशासनाची आखणी आहे. मात्र वाहनधारक नियमांना बगल देत असल्याने लक्षावधी रुपयांचा दंड आकारुनही वाहतुक व्यवस्थेला खीळ लावण्याचे कार्य सुरुच आहे. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध केलेल्या कारवाईनंतर सदर बाब उघडकीला आली आहे. गत दहा महिन्यात वाहतुक पोलिसांनी ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या शेकडो चालकांविरुद्ध कारवाई करीत तीन लक्ष ७८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र ट्रिपल सीट चालविणाऱ्यांवर कुठलाही परिणाम झालेला दिसून येत नाही. जानेवारी महिन्यात पोलिसांनी २१२ दुचाकी वाहन चालकांवर ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई करीत ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात १७१, मार्च महिन्यात १२४, एप्रिल महिन्यात २२३, मे १०२, जुन २१९, जुलै १२३, ऑगस्ट १६८, सप्टेंबर १७० तर ऑक्टोबर महिन्यात २२० दुचाकी वाहन चालकांवर ट्रिपल सीट वाहन चालविण्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. या सर्व वाहनधारकांकडून दंड वसूल करुन त्यानंतर असा प्रकार करणार नाही असा सज्जड दमही भरला. मात्र आजही खुलेआमपणे पोलिसांची नजर चुकवून ट्रिपल सीट वाहतुक सुरुच आहे. एखादा मोठा अपघात घडल्यावर वाहतूक शाखेने किंवा शहर पोलिसांची कारवाई झाल्यास ओरड होते. मात्र वाहतुक नियमांना तिलांजली देणाऱ्यांविरुद्ध ओरड होत नाही. दरम्यान अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नये असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा अल्पवयीन सोबतच त्यांच्या पालकांवरही कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान सर्वांनीच वाहतुक नियमांचे पालन करुन संभावित धोका टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य मार्गावर वेगाने धावतात वाहनेभंडारा शहरात दुचाकीवर ट्रिपल सीट जाताना सहजपणे दिसून येतात. विशषेत: बसस्थानक चौक ते शास्त्री चौकपर्यंतच्या रस्त्यावर हा प्रकार पहावयास मिळतो. गल्लीबोळीतून निघून ही हुशार वाहन चालके सहजपणे पळ काढतानाही दिसून येतात. 

१० महिन्यात तीन लक्ष ७८ हजारांचा दंडभंडारा : जिल्हा पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई करीत गत दहा महिन्यात १८३२ दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करीत ३ लक्ष ७८ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तरीही ट्रिपल सीट वाहतूक आजही बिनधास्तपणे सुरु आहे. 

जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासोबतच नियमांचे पालन व्हावे यासाठी आमचे कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. अर्थातच यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात विविध नवोपक्रम आखण्यात आले असून त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. - शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, भंडारा

ऑक्टोबरमध्ये २२० वाहनधारकांवर कारवाईएकट्या ऑक्टोबर महिन्यात वाहतूक शाखेने ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या २२० जणांवर कारवाई केली. यात त्यांच्याकडुन ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. विशेषत: एप्रिल व जुलै महिन्यात प्रत्येकी २२३ दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. ग्रामीण भागातही राज्यमार्गासह ग्रामीण रस्त्यांवर खुलेआमपणे ट्रिपल सीट वाहन चालविण्याचा प्रकार दिसून येतात. अनेकदा कारवाई सुद्धा केली जाते. मात्र दंड भरुन मोकळे व्हावे मात्र नियमांचे पालन करु नये असा चंगही बांधल्याचे वाहनधारकांच्या वर्तनावरुन दिसून येते. 

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी