शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षकांनी दृष्टिकोन बदलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:23 IST

येणारा काळ सतत बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तो २१ व्या शतकातील विद्यार्थी आहे. यासाठी २० व्या शतकातील शिक्षकांनी २१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा....

ठळक मुद्देदत्तात्रय मेंढेकर यांचे प्रतिपादन : अविरत २०१७ प्रशिक्षणाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येणारा काळ सतत बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तो २१ व्या शतकातील विद्यार्थी आहे. यासाठी २० व्या शतकातील शिक्षकांनी २१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून आपला दृष्टीकोन बदलावा, असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था भंडाराचे डॉ. दत्तात्रय मेंढेकर यांनी केले.२१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा समजून त्यांला प्रतिसाद देण्यासाठी, शिक्षकांच्या दृष्टीकोनात व कौशल्यांमध्ये वाढ होण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाद्वारे एक महत्वाकांक्षी सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास प्रशिक्षण अविरत २०१७ च्या दुसºया टप्प्याचे उद्घाटनआठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी उपशिक्षणाधिकारी गोवर्धन भोंगाडे, प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. अभय परिहार, तज्ज्ञ मार्गदर्शक नूतन कन्या विद्यालय भंडारा येथील सहायक शिक्षक कैलास कुरंजेकर, जिजामाता विद्यालय भंडारा येथील मुख्याध्यापक शशीकांत हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. मेंढेकर पुढे म्हणाले, शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकात जो उत्साह असतो तोच उत्साह सेवानिवृृत्त होईपर्यंत टिकून राहणे आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संबंधित शिक्षक हवाहवासा वाटावा, यासाठी शिक्षकाने जीव ओतून शिकवावे. शिक्षकांनी तणावमुक्त वातावरणात राहून आनंददायी शिक्षण द्यावे, महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांकावर कसा येईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. गोवर्धन भोंगाडे म्हणाले, विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण देता यावे यासाठी शिक्षकांनी सतत वाचावे, आपल्या ज्ञानात भर पडावी यासाठी प्रयत्न करावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यापेक्षा दहा पटीने ज्ञानात पुढे असायला पाहिजे. डॉ. अभय परिहार म्हणाले, किशोरवयीन मुलांची वादळी अवस्था असते. त्यांच्या मनात संघर्षाची अवस्था निर्माण झाली असते. अशावेळी त्या विद्यार्थ्यासोबत शिक्षकांनी कसे वागावे याची जाणीव ठेवावी. राज्याचा के.आर. ए. वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. सर्वप्रथम दिवंगत सहायक शिक्षिका स्वाती घाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन अर्चना बेदरकर यांनी केले तर आभार रामकृष्ण वाडीभस्मे यांनी मानले. प्रशिक्षणात भंडारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांचा सहभाग आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी