शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजप फुटीर गटाला अर्थ व बांधकाम सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभापतींचे खातेवाटप आणि १० समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली.  बांधकाम सभापतीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. काँग्रेसचे रमेश पारधी बांधकाम सभापती पद मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला मदत करणाऱ्या भाजपच्या फुटीर गटाने बांधकाम सभापती पद प्रतिष्ठेचे केले होते. अखेर मंगळवारच्या सभेत त्यांनी हे पद आपल्या पदरात पाडून घेतले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेनंतर सभापती पदावरुन सुरु असलेल्या चढाओढीत अखेर भाजप फुटीर गट सरशी ठरला. महत्वाचे अर्थ व बांधकाम सभापतीपद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संदीप ताले यांना देण्यात आले. तर अपक्ष राजेश सेलोकर यांना कृषी व पशुसंवर्धन तर काँग्रेसचे रमेश पारधी यांना शिक्षण व आरोग्य विभाग देण्यात आला. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या फुटीर गटासोबत केलेली हातमिळवणी आता काँग्रेसलाच जड जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.भंडारा जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभापतींचे खातेवाटप आणि १० समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली.  बांधकाम सभापतीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. काँग्रेसचे रमेश पारधी बांधकाम सभापती पद मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला मदत करणाऱ्या भाजपच्या फुटीर गटाने बांधकाम सभापती पद प्रतिष्ठेचे केले होते. अखेर मंगळवारच्या सभेत त्यांनी हे पद आपल्या पदरात पाडून घेतले. भाजपच्या फुटीर गटासोबत असलेले अपक्ष राजेश सेलोकर यांना कृषी व पशुसंवर्धन तर काँग्रेसचे रमेश पारधी यांना शिक्षण व आरोग्य विभाग देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षांकडे स्थायी व जलसंवर्धन विभाग राहणार आहे. यापूर्वी समाज कल्याण सभापतीपदी मदन रामटेके तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी स्वाती वाघाये यांची निवड करण्यात आली होती.

समिती निवडीवरुन सदस्य आक्रमक- दहा विषय समित्यांच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. मात्र निवडीचे अधिकार कुणाला आहेत यावरुन सभेत चांगलीच खडाजंगी झाली. समिती वाटपाचे अधिकार अध्यक्षांना असल्याचे सांगण्यात आले. त्यावर  राष्ट्रवादीचे यशवंत सोनकुसरे आणि भाजप गटनेते विनोद बांते यांनी असे अधिकार अध्यक्षांना नसुन सभागृहाला असल्याचे सांगितले. अध्यक्षांनी विषयाची मांडणी करावी. सभा त्याला अनुमोदन देईल असे सांगितले. ही मागणी अध्यक्षांनी मान्य केली आणि समितीवरील सदस्यांची निवड पार पडली.

सभेला एक तास विलंब- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी १ वाजता आयोजित होती. मात्र ही सभा तब्बल एक तासाने म्हणजे २ वाजता सुरु झाली. यावेळी सदस्य प्रियंक बोरकर यांनी नाराजी व्यक्त करीत अध्यक्ष शिक्षक आहेत. ते शिस्तप्रिय आहेत. त्यामुळे सभा उशिरा होणे योग्य नसल्याचे म्हटले. त्यावर अध्यक्षांनी ही सभा पुढल्या वेळी नियोजित वेळीच होईल असे सांगितले.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद