लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कंत्राटदारांवरील अतिरिक्त भुर्दंड शासनाने भरावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व कामे बंद ठेऊन नवीन कामाच्या निविदावर बहिष्कार घालण्याचा इशारा जिल्हा कंत्राटदार संघटनेने निवासी जिल्हाधिकाºयांमार्फेत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.निवेदनानुसार, १ जुलै २०१७ पुर्वीच्या अंदाजपत्रकामध्ये व्हॅट ५ टक्के सरसकट लागु करण्यात आले होते. परंतु आता जीएसटी १८ टक्के सरसकट लागू करण्यात आले आहे. परंतु जीएसटीचा समावेश अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारावर जवळपास १३ टक्के अतिरिक्त भुर्दंड नाहक बसलेला आहे. कंत्राटदारांवरील अतिरिक्त भुर्दंड शासनाने भरावा, अन्यथा कामे बंद ठेऊन नविन कामाच्या निविदावर बहीष्कार घालण्याचा इशारा जिल्ह्यातील सर्व कंत्राटदार, सुशिक्षीत बेरोजगार अभियंता संघटना व मजूर सहकारी संस्था व इतर सर्व कंत्राटदाराांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात महाराष्टÑ अभियंता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप पडोळे, भंडारा जिल्हा कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश चकोले, अखील रजवी, नंदू गहाने, अजय साकुरे, मोहन नायर, अरुण लांजेवार, मजूर सहकारी संस्थाचे संघाचे अध्यक्ष कैलाश नशिने तसेच सुशिक्षीत बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वंजारी, हेमंत क्षिरसागर, अरविंद वंजारी, श्रीकांत टेंभरे, राजेश दोनोडे, ज्ञानेश्वर धुर्वे, महेश पटले, आलोक पशिने, सुनिल साखरकर, नंदू कावळे, तसेच सहकारी संस्थेचे रिंके कावळे, भिमराव गभने, भरत खंडाईत, मदन बागडे, निखिल ब्राम्हणकर, कुरैशी, घाटबांधे व कंत्राटदार रमेश बावनकर, शिनो मॅथ्यू, मॅथ्यु जॉन, राज फेंडरकर, रुपेश मेश्राम, जवाहर कुंभलकर, बाळा पडोळे, आशिष पशिने यांच्यासह अन्य कंत्राटदारांचा समावेश होता.
अतिरिक्त भुर्दंड शासनाने भरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:02 IST
कंत्राटदारांवरील अतिरिक्त भुर्दंड शासनाने भरावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व कामे बंद ठेऊन नवीन कामाच्या निविदावर बहिष्कार घालण्याचा इशारा .....
अतिरिक्त भुर्दंड शासनाने भरावा
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : कंत्राटदार असोसिएशनची मागणी