शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गोवारी समाजाचा लढा कायमच

By admin | Updated: April 7, 2017 00:41 IST

मानवाला आधुनिक युगात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या पाच मुलभूत गरजांची आवश्यकता अधिक आहे.

मुलभूत सुविधांपासून वंचित : उदरनिर्वाहासाठी स्थलांतराचे प्रमाण वाढलेआलेसूर : मानवाला आधुनिक युगात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या पाच मुलभूत गरजांची आवश्यकता अधिक आहे.मात्र स्वातंत्र्यप्राप्ती काळातही हा निसर्ग पुजक असलेला गोवारी समाज आजही मुलभूत गरजांसाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत आहे. जिल्ह्यात लोकसंख्या हजारोंच्या आकडेवारीत नमुद असून राजस्व अभिलेखात सर्वात जास्त अत्यल्प भूधारक भूमीहीन म्हणून नोंद आहे. सदर समाज आजही वडीलोपार्जीत पारंपारिकरित्या पशुपालन करीत असून कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी परराज्यात स्थलांतर करीत आहे. राज्यात २९,४२६६४ तर जिल्ह्यात २,६४६२४ यात तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा व नवनिर्मित आंबागड जिल्हा परिषद क्षेत्रात गोवारी समाजाचे प्रमाण अधिक आहे.गोवारी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा या मागणीसाठी गेल्या चार दशकापासून संघर्ष सुरु होता. यात राज्य व केंद्र शासनाने इतर मागास प्रवर्गात त्याचा समावेश करून दुधावरची तहान ताकावर भागविली. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाने नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. या मोर्चात ११४ निष्पाप गोवारींचा बळी गेला. या चार दशकाच्या इतिहासात सन १९५३ मध्ये स्थापन झालेल्या काकासाहेब कार्लेकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आयोगाने गोवारी जमात ही आदिवासी असल्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती. परंतु हे विधेयक येत असताना लोकसभा बरखास्त झाली. गोवारी समाजाच्या अनेक नेत्यांनी गोवारी ही आदिवासी जमात असल्याचे पुरावे दिल्यानंतर शासनाने या खऱ्या मागणीकडे दुर्लक्ष केले. असा आरोप या जनतेने केले.वास्तविकरित्या आजही हा समाज सह्याद्री, सातपुडा, गोंडवन या डोंगरदऱ्या खोऱ्यात वास्तव्य करीत असून संगणकीकृत युगात अठराविश्वच्या दारिद्र्यात जीवन जगत आहे. शैक्षणिक क्रांतीस पिछेहाट असल्यामुळे पारंपारिकरित्या पशुपालन हाच मुळ व्यवसाय समजून काही काळासाठी चारापाण्याअभावी बिऱ्हाडासमवेत आंतरजिल्ह्यात स्थलांतर करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. शासनाचा अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी कायदा अंतर्गत काही प्रमाणात वन जमिनी प्राप्त झाल्यामुळे स्थलांतरणाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)