शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या पैलूंवर ‘लोकराज्य’मध्ये उजाळा

By admin | Updated: April 14, 2017 00:36 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील मानवी हक्काचा मोठा अध्याय असून त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर....

अमित मेश्राम यांचे प्रतिपादन : माहिती जनसंपर्क कार्यालयाचा उपक्रमभंडारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील मानवी हक्काचा मोठा अध्याय असून त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचे काम लोकराज्य विशेषांकाच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने करण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी अमीत मेश्राम यांनी केले.येथील जिल्हा कोषागार कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचानालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन अमित मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिाकरी रवी गीते, अप्पर कोषागार अधिकारी अर्चना कसबेकर, राजू शेंडे, राजू कणखर, सहाय्यक लेखाधिकारी अनिल बोंद्रे, कोषागार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अमित मेश्राम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कठोर ज्ञान साधनेमुळेच ते उन्नत झाले. त्यांचा अभ्यास सर्वव्यापी होता. खऱ्या अर्थाने ते महात्मा फुले यांच्या विचारांचे वारसदार आहेत. पत्रकारिता क्षेत्रासह दलित वंचित स्त्रियांसाठी त्यांनी मोठे काम केले. या त्यांच्या कार्याचा आढावा लोकराज्यच्या विशेषांकात घेण्यात आला आहे. समाजाला माहित नसलेल्या बाबासाहेबांच्या अनेक पैलूंची माहिती या विशेषांकात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या वतीने देश विदेशात उभारण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या विविध स्मारकांचा आढावाही या विशेषांकात घेण्यात आला आहे. ही स्मारके पुढच्या अनेक पिढीसाठी प्रेरणा व उर्जा देणारी ठरणार आहेत.बाबासाहेबांनी आयुष्यभर तत्त्वनिष्ठा जपली. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी त्यांनी काम केले. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी अस्पृश्य महिला परिषदा भरविल्या. त्यांच्या सत्याग्रहात वंचित, दलित महिलांचा मोठा सहभाग होता. बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील कार्यकाळ कमी असला तरी तो समृद्ध होता. २० व्या शतकातील पहिल्या पर्वातील ते मोठे पत्रकार होते. समाजातील दलित वंचित घटकांना न्याय देण्याचे काम त्यांच्या लेखणीने केले. देशाच्या उभारणीत त्यांचा वाटा मोठा असल्याचे मेश्राम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)