शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाची शेतकऱ्यांमध्ये पुन्हा धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : खरीप हंगामात सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना आता धान विकताना पुन्हा ...

ठळक मुद्देजिल्ह्याच्या काही भागात बरसला पाऊस : आधारभूत केंद्रावरील धान झाकण्यासाठी उडाली तारांबळ

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना आता धान विकताना पुन्हा त्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाच्या हजेरीने शेतकरी धास्तावला आहे. आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.जिल्ह्यात गुरूवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही भागात पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह लाखनी, कोंढा, पालांदूर, लोहारा व जांब, कांंद्री, लाखांदूर, पवनी तालुक्यातील चौरास भाग, मोहदुरा यासह खरबी नाका परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात दोन दिवसापासून असलेल्या या ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले आहेत. खमारी येथे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या जिल्ह्यातील ७९ केंद्रावर आधारभूत धान खरेदी केली जात आहे. आतापर्यंत ७० ते ८० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला धान आधारभूत केंद्रावर आणून तो बाहेर उघड्यावर ठेवला आहे. आता पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ताडपत्र्या झाकून धान वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे काही शेतांमध्ये उच्च प्रतीच्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. या ढगाळ वातावरणामुळे कडपा ओला होत आहे. मजुराअभावी धान काढणे कठीण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कडपा झाकून ठेवला आहे.यावर्षी शेतकऱ्यांना महापुरासह कीडींच्या प्रादूर्भावाचा सामना करावा लागला. संकटाशी दोन हात करीत शेतकऱ्यांच्या घरी धान आला. त्यातही उतारा निम्म्यावर आल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. आता धान विकायला काढला तर पुन्हा पावसाने हजेरी लावली. गत काही वर्षांपासून शेतकरी नैसर्गीक संकटांचा सामना करीत असल्याचे दिसत आहे.

धान खरेदी केंद्रावर मनुष्यबळाचा अभाव जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीचे ७९ केंद्र सुरू झाले आहेत. परंतु याठिकाणी मनुष्यबळाचा अभाव असल्याने धान मोजणीस विलंब होत आहे. केंद्रावर धानाची पोती उचलण्यासाठी हमाल अतिरिक्त दर घेत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे धान खरेदी केंद्रावर मोजणीपर्यंतची जबाबदारी शेतकऱ्यांची आणि मोजणी झाल्यानंतरची जवाबदारी खरेदी केंद्र चालकांची असते. शेतकऱ्यांचा धान आणला त्यादिवशीच विकला गेला तर शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्तीला तोंड द्यावे लागणार नाही. परंतु शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागते आणि सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना येथे दिसत नाही.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊस