शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
4
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
5
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
6
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
7
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
8
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
9
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
10
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
11
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
12
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
13
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
14
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
15
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
16
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

कृषी विभागाच्या कारवाईची कृषी केंद्र चालकात धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:09 PM

कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या केंद्र चालकांना सूचना : केंद्रांसह गोदामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी, त्रृटी आढळल्यास कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन खरीप हंगामात जादा दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांना लुटण्याऱ्या कृषी केंद्र चालकांना निलंबित केल्याने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांत धास्ती पसरली आहे. जादा दराने खत बियाण्यांच्या विक्रीसह पॉस मशीन व खतसाठा रजिस्टरवरील हिशोब जुळत नसल्याने कृषी विभागाकडून गत महिभरात अनेक कृषी केंद्रांवर करकारवाई करुन अनेक दुकानांचा विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.कृषी केंद्र चालकांविरुद्ध कारवाईची जिल्हा कृषी विभागाने धडक मोहीम उघडली आहे. यासाठी जिल्ह्यात आठ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. स्वत: जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड या पथकांवर लक्ष ठेवून दररोज दैनंदिन आढावा घेत आहेत.गत आठवड्यात जिल्ह्यात १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने एकाच वेळी रद्द करण्यात आले आहेत. पॉस मशीन व खत साठ्यात तफावत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली.यामध्ये मोहाडी तालुक्यातील दहा कृषी केंद्रांवर तर तुमसर तालुक्यातील दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत करडी परिसरातील सर्वाधिक कृषी केंद्रांचा समावेश आहे.कृषी विभागाने अचानक धाड मारली असता या कृषी केंद्रांत शासनाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुकानदार बिलावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या न घेता त्यांना तसेच बिल दिल्याचेही दिसून आले. या सर्व कृषी केंद्र चालकांवर रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, मोहीम अधिकारी विकास चौधरी, मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, तुमसर तालुका कृषी अधिकारी विलास काळे, मोहाडी पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र वंजारी, तुमसरचे संजय न्यायमूर्ती हे सहभागी झाले होते. खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. याबाबत तक्रारी वाढताच कृषी विभागाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई सुरु राहिल्यास शेतकºयांना लुबाडण्याची दुकानदारांची हिंमत होणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र