शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सासराच बनला सुनेचा कर्दनकाळ, मानेवर केले कुऱ्हाडीचे वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:25 IST

मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील थरार

भंडारा : सासरा व सुनेतील भांडण इतके विकोपाला गेले की सासऱ्याने रागाच्या भरात सुनेच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार घालून तिची हत्या केली. पिंकी सतीश ईश्वरकर (२५) असे मृत पावलेल्या सुनेचे नाव आहे. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे शुक्रवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. बळवंत रघुजी ईश्वरकर (५५, रोहणा) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. मृत पिंकीला तीन वर्षाचा एक मुलगा असून आईच्या प्रेमाला मुकला आहे.

बळवंत ईश्वरकर हा मुलगा सतीश व सून पिंकी ईश्वरकर व तीन वर्षांच्या नातवासोबत एकाच घरात राहयचे. बळवंतच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. काही दिवसांपासून सासरा व सुनेत नेहमी भांडण होत असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळी पिंकी भांडी घासत असताना सासरा बळवंत याने मागेहून येऊन पिंकीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. तशीच ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. यावेळी तिचा पती व मुलगा किराणा दुकानात गेले होते. बळवंत ईश्वरकरला अटक करण्यात आली आहे. भांडण कशावरून सुरू होते, सुनेची हत्या करण्यापर्यंत बळवंतने निर्णय का घेतला, हत्येचे नेमके कारण काय, या दिशेने मोहाडी पोलिस तपास करीत आहेत.

स्वत: च गेला पोलिस ठाण्यात

सुनेवर कुऱ्हाडीचे घाव घातल्यानंतर आरोपी बळवंत हा स्वत: च मोहाडी पोलिस ठाण्यात गेला. तसेच त्याने सुनेची हत्या केल्याची माहिती दिली. याचवेळी त्याला ताब्यात घेत पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा