निवडणूक यंत्रणा सज्ज : प्रत्येकी १७ वॉर्डासाठी १७ मतदान केंद्र, पोलिसांचा चोख बंदोबस्तभंडारा : नगरपंचायत निवडणुकीसाठी मोहाडी, लाखनी, लाखांदूर याठिकाणी यंत्रणा सज्ज असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या तीन नगर पंचायत निवडणुकीत प्रत्येकी १७ वॉर्डांसाठी १७ मतदान केंद्र आहेत.९९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होणारलाखांदूर : पहिल्यांदा होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकी ९९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून आज ७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावून उमेदवाराचे भाग्य मशीनबंद करणार आहेत. २००५ ला लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. १७ प्रभागात एकूण ९९ उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष ३८, भाजपा १७, काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस १७, शिवेसना १० असे एकूण निवडणूक रिंगणात आहेत. १७ प्रभागाच्या मतदानाकरिता १७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर व मतदान केंद्र अधिकारी व तीन कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी असे एकूण पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. नगर पंचायत निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून लाखांदूरचे पोलीस निरीक्षक देविदास भोयर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.मोहाडीत ६८ अधिकाऱ्यावर धुरामोहाडी : नगरपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा पूर्णत: सज्ज झाली आहे. १७ प्रभागासाठी मतदान केंद्रावर प्रत्येकी ४ अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आला आहे. त्यात एक केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी ६८ अधिकारी नियुक्त करण्यात आले. राखीव पथक ३ आहेत. झोनल अधिकारी यांचे पथक तीन तयार करण्यात आले आहेत. एका प्रभागाच्या मतदान केंद्रावर एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली. १७ प्रभागात स्त्री मतदार ३,८५४ तर पुरुष मतदार ४,०२५ एकूण ७,८६९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर शांतता ठेवण्यासाठी ठाणेदार गुंजवटे यांचे फिरते पथक काम करणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जसराज सूर्यवंशी निवडणुकीवर पूर्व लक्ष ठेऊन आहेत.लाखनीत १०,२९४ मतदार मतदान करणारलाखनी : नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेची तयारी नगरपंचायत व तालुका तहसील प्रशासनाद्वारे पूर्ण झाली आहे. सकाळी १० वाजतापासून निवडणूक कर्मचारी १७ प्रभागातील बुथवर रवाना झाले. एका बुथवर चार कर्मचारी नियुक्त केले आहे. सोबत एका पोलीस कर्मचारी व सोबतीला मदतीसाठी होमगार्ड दिले आहेत. आज ७३ उमेदवारांचे भाग्य पेटीत बंद होणार आहे.लाखनी शहरात १०२९४ मतदार मतदान करणार आहे. यात पुरुष मतदारांची संख्या ५१३१ व स्त्री मतदार ५१६१ आहेत. लाखनी नगरपंचायतचे ९ प्रभाग महिलासाठी राखीव आहेत तर ८ प्रभागात पुरुषांना संधी आहे. लाखनीत पोलीस प्रशासन सज्ज असून पोलीस निरिक्षक हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त आहे. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय उरकुडे, तहसीलदार डी. सी. बोंबर्डे, नायब तहसीलदार एस. ए. घारगडे, अश्विन जाधव, तहसील कर्मचारी व नगर पंचायतचे कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
२७१ उमेदवारांचे भाग्य मतदारांच्या हातात
By admin | Updated: November 1, 2015 00:43 IST