शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस लांबण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या हंगामावर उठलेला आहे. हप्ताभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. धान पिकाचा हंगाम जोमात असला तरी नियमित पाऊस चिंतेचा झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली तर निश्चितच अपेक्षित हंगाम हाती लागणार आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतात हलका धान आठवडाभरात काढणीला येणार आहे. मात्र निसर्गाची टांगती तलवार शेतकऱ्याचा कर्दनकाळ ठरत आहे. जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. 

मुखरू बागडे लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : परतीचा पाऊस लांबण्याच्या शक्यतेने धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. चुलबंद खोऱ्यात हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पाऊस लांबल्यास हलक्या धानाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे धान पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या हंगामावर उठलेला आहे. हप्ताभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. धान पिकाचा हंगाम जोमात असला तरी नियमित पाऊस चिंतेचा झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली तर निश्चितच अपेक्षित हंगाम हाती लागणार आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतात हलका धान आठवडाभरात काढणीला येणार आहे. मात्र निसर्गाची टांगती तलवार शेतकऱ्याचा कर्दनकाळ ठरत आहे. जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्येसुद्धा पाऊस कोसळत आहे. जलसाठे पूर्णत्वाकडे जात असून काही ठिकाणी ओव्हर फ्लोचे चित्र अनुभवायला येत आहे. कापणी योग्य धान पावसाच्या दणक्यात मातीमोल होत आहे. लोंबी जड होत असल्याने संकट उभे आहे. पावसाने विश्रांती घेतली नाही हंगाम हातचा जाण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम कालावधीचे धान कापणी योग्य झालेले आहेत. नियमित पाऊस व ढगाळ हवामानाने भारी धानसुद्धा लवकरच फुलोऱ्यावर येत आहेत. अशा संकटसमयी शेतकरी चिंतातुर असून करावे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा मान्सून राजस्थानमधून माघार घेतो. गत पाच वर्षांचा अभ्यास घेतला असता १५ सप्टेंबरनंतरच मान्सूनने माघार घेतलेली आहे. राजस्थानातून माघारीची तारीख १ सप्टेंबर यापूर्वी ठरविण्यात आली होती. परंतु हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊस लांबत असल्याचे दिसत आहे.

धान पिकावर रोगराईचे संकट ! - नियमित ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर रोगराईचे संकट आहे. करपा, कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी, रसशोषक कीडी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. पावसामुळे फवारणीचे नियोजन फसत आहे. फवारणी न केल्यास अपेक्षित धान पीक हाती येण्याची शक्यता अत्यल्प आहे. लोंबी न भरणे, मानमोडी, हळद्या रोग, तुडतुडा यासारख्या रोगांची लागण दिसत आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढत आहे. परतीचा पाऊस लांबल्यास हंगाम ओल्या दुष्काळाच्या छायेत जाण्याची दाट शक्यता आहे.

धान परिपक्व होऊन कापणी योग्य आहे. नियमित पाऊस व वाऱ्याने धान झोपलेला आहे. हंगाम हाती घेऊन डोळ्यांच्या समोर मातीमोल होत असल्याने हृदयाचे ठोके वाढलेले आहेत.-गजानन शिवणकर, शेतकरी  ढिवरखेडा

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी