शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:11 IST

बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती साधावी. कितीही संकटे आले तरी न डगमगता त्यावर मात करत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा लाभ घेवून स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी उपस्थित शेतकºयांना केले.

ठळक मुद्देमधुकर कुकडे : भंडारा कृषी विभागातर्फे शेतकरी दिन, विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती साधावी. कितीही संकटे आले तरी न डगमगता त्यावर मात करत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा लाभ घेवून स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी उपस्थित शेतकºयांना केले.पद्मश्री विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारला कृषी विभागाच्या वतीने शेतकरी दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा गोडमाटे उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, साकोली कृषी विन केंद्राचे तज्ज्ञ डॉ.शामकुवर, बलसाने, कृषी उपसंचालक भंडारा, कृषीभूषण पुरस्कारप्राप्त अण्णाजी हांडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व्यासपीठावर उपस्थित होते.प्रज्ञा गोडमाटे यांनी मार्गदर्शनात शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेवून जास्तीत जास्त फळबागा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.अण्णाजी हांडे यांनी प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास संकटावर मात करता येते. असा विश्वास बोलताना व्यक्त केला. शेतकऱ्यांनीही आपला शेतीव्यवसाय प्रामाणिकपणे करून सेंद्रीय शेतीसाठी योगदान देण्याची गरज असल्याचे सांगितले.कृषीशास्त्रज्ञ डॉ.शामकुवर यांनी शेतकऱ्यांना उत्पादनवाढीच्या विविध बाबी समजावून सांगून कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने शेतीत बदल करण्याचे आवाहन केले.शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांचा खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते तसेच जिल्हा कृषी अधिक्षक चव्हाण यांच्या हस्ते, प्रज्ञा गोडगाटेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये शेषराव निखाडे (कृषीभूषण पुरस्कार प्राप्त) शेतकरी, यादोराव मेंढे शेतीनिष्ठ शेतकरी, डॉ.संजय एकापुरे प्रगतशील शेतकरी, तानाजी गायधने चिखलीचे प्रयोगशील शेतकरी, दुर्योधन सयाज, देवानंद गायधने या जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सदर कार्यक्रमात भातपिकांचे कीड, रोग सर्वेक्षण, शेतातील महिलांचा सहभाग, खोडकिडींच्या नियंत्रणासाठीची उपाययोजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन करून सेंद्रीय शेतीसाठी तंत्रज्ञान अवलंबिण्याबाबत आवाहन केले. शेतकऱ्यांनी आधुनिक पिक पध्दतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.कृषीदिनासाठी जिल्हाभरातून अनेक शेतकरी तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, मंडळ अधिकारी होमराज धांडे, डी.एस. अहिर, पर्यवेक्षक बी.डी. बावनकर, ए.के. डोर्लीकर यांच्यासह कृषी कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले. संचालन आनंद मोहतुरे यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी कोडापे, मेहर, नान्हे, मेश्राम, गिरीश रणदिवे, अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.