शेतकऱ्यांनी भात शेतीसोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:32 PM2018-06-23T22:32:01+5:302018-06-23T22:32:44+5:30

Farmers should go to the supermarket along with rice cultivation | शेतकऱ्यांनी भात शेतीसोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे

शेतकऱ्यांनी भात शेतीसोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी शांतनू गोयल : शेतकरी मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिक घेण्यात येते. शेतकऱ्यांनी भातशेती सोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे. पशुपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम आदी व्यवसायावर भर द्यावा. जोडधंद्याची सांगड शेती सोबत घातल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सभागृह येथे जैविक (आॅरगॅनिक शेती ) शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्लॅनिंग कमिशन भारत सरकारचे सदस्य डॉ. राजाराम त्रिपाठी, आॅरगॅनिक शेती तज्ञ अण्णाजी हांडे, महेंद्रसिंग ठाकूर, वनऔषधी उत्पादन तज्ञ शिप्रा त्रिपाठी, प्रकल्प संचालक (आत्मा) हिंदुराव चव्हाण, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.ए. कोठारी, ज्येष्ठ अधिवक्ता कांचन कोतवाल उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले,अनेक जिल्ह्यात ज्या मालास जास्त भाव मिळतो तेच पिक शेतकरी घेतात. गोसेखुर्द, बावणथडी प्रकल्प असे मोठे प्रकल्प असूनही शेतकरी पावसाच्या भरवश्यावर असतात. शेतकऱ्यांनी शेतीसह पुरक व्यवसायाकडे वळावे. जिल्ह्यात ५० ठिकाणी भात पिकासोबत तुती लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. आत्माच्या योजनांचा लाभ घ्या, असेही ते म्हणाले.
प्रारंभी वृक्षाला मान्यवरांच्या हस्ते पाणी देवून शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. आॅरगॅनिक शेती तज्ञ अण्णाजी हांडे, महेंद्रसिंग ठाकूर, अण्णाजी हांडे, प्लॅनिंग कमिशन भारत सरकारचे सदस्य डॉ. राजाराम त्रिपाठी, यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी जैविक शेतीबाबत यथोचित मार्गदर्शन केले.
तहसिलदार संजय पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध योजना विषयी माहिती दिली. त्यात नरेगाबाबत माहिती देतांना ते म्हणाले की नरेगा सर्व प्रथम भंडारा व गोंदिया जिल्हयात लागू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांची परिस्थिती सुधारण्यास रोजगार हमी योजना आवश्यक आहे. शाश्वत विकासाकडे भारताने पाऊल टाकणे हा नरेगा योजनेचा उद्देश आहे. समृध्द महाराष्ट्र जन कल्याण योजनेची माहिती त्यांनी यावेळी दिली. वनऔषधी उत्पादन तज्ञ शिप्रा त्रिपाठी यांनी शेतकऱ्यांवर आधारित कबीराची कविता सादर केली.

Web Title: Farmers should go to the supermarket along with rice cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.