शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

शेतकऱ्यांनो, आधुनिक शेतीची कास धरा

By admin | Updated: January 5, 2016 00:36 IST

वैज्ञानिक युगात पारंपरिक पध्दतीने शेती करणे परवडणारी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीचा विकास करावा,

बाळा काशिवार यांचे आवाहन : साकोलीत कृषी मेळावा-प्रदर्शनीसाकोली : वैज्ञानिक युगात पारंपरिक पध्दतीने शेती करणे परवडणारी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीचा विकास करावा, असे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने तालुका बीज गुणन प्रक्षेत्रात आयोजित शेती दिन व कृषी प्रदर्शनी कार्यक्रमात काशिवार बोलत होते. शेतात रासायनिक खते वापरल्याने जमीनीतील जिवाणू नष्ट होऊन जमिनीची सुपीकता नष्ट होते. व यामुळे उत्पादन क्षमतेत घट निर्माण झाली आहे. यासाठी शेतजमीनीत जिवामृत वापरण्याचे आवाहन करुन काशीवार यांनी बँकेद्वारे होत असलेली सक्तीची वसुली बंद करण्याची मागणी त्यांनी केली.यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, पंचायत समितीचे सभापती धनपाल उंदीरवाडे, तहसीलदार शोभाराम मोटघरे, खंड विकास अधिकारी शबाना मोकासे आत्माच्या प्रकल्प संचालिका प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, मंदा गणवीर, कार्यक्रमाध्यक्ष व कृषी भुषण रामचंद्र कापगते, उपविभागीय अधिकारी डी.पी. तलमले, कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे, डॉ. जी. आर. शामकुंवर, उप विभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, एस. पी. लोखंडे, यादवराव कापगते, मारोती चांदेवार, ए. एस. कुंभरे, जी. के. चौधरी, पं.स. सदस्या धनवंता राऊत, उषा डोंगरवार, पर्वते, वंजारी, मनीष कापगते, प्रभाकर सपाटे आदी उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस व भात पिकावर विविध रोगाच्या प्रादुर्भावाने भात पिकांचे नुकसान झाले आहे. पण शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ घेऊन समस्या सोडवाव्यात. याप्रसंगी डॉ. जी. आर. शामकुंवर, यशदीपसिंग गिरासे, डॉ. वंजारी, यादवराव कापगते यांच्याकडून शेतकऱ्यांना यथोचित मार्गदर्शन करण्यात आले.कृषी प्रदर्शनीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती विविध कंपन्यांद्वारे शेतीविषयक नवीन उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले होते. कृषी विभागाद्वारे शेती विषयी मार्गदर्शिका पोस्टर्स इत्यादी साहित्य व संकरित बी-बियो इत्यादी स्टॉल्स लावण्यात आले. पाहुण्यांनी कृषी प्रदर्शनीचे अवलोकन करुन प्रशंसा केली.कृषी मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते कृषी विषयक वार्षिक कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमासाठी चंदन मेश्राम, खोब्रागडे, साठवणे, श्रीकांत सपाटे व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. संचालन मोहाडीचे तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी तर आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी साकोली जी के. चौधरी यांनी केले. यावेळी तालुक्यातील शेतकरी, महिला शेतकरी, बचत गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कृषी मेळाव्याच्या अंतिम टप्प्यात खासदार नाना सपटोले यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित शेतकरी व अधिकारी यांच्याशी पटोले यांनी चर्चा करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांना शासकीय योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)