शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:05 IST

Bhandara : निवडणुकीपुरतीच योजनेची अंमलबजावणी होती का? शेतकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न

रवींद्र चन्नेकरलोकमत न्यूज नेटवर्क बारव्हा : पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताच मिळालेला नाही. नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना ओढ लागली आहे. लाखांदूर तालुक्यात आजही खरीप हंगामातील शेतीवर अनेक कुटुंब अवलंबून आहेत. केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. त्यानुसार मागील वर्षी राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. त्याचा पहिला, दुसरा हप्ता टप्प्याटप्प्याने दिला. त्यानंतर २८ फेब्रुवारीला केंद्र आणि राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीआधी दोन्ही एकदम हप्ते दिले.

शेतकऱ्यांची शेती ही हवामानावर अवलंबून असते. पोषक हवामान मिळाले, तरच शेतीत चार पैसे मिळतात. त्यातच पिकाला उत्पादन खर्चावर आधारित आवश्यक तो हमीभाव मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही चांगले मिळत नसल्याने त्यांनी काढलेली कर्जे भरली जात नाहीत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेंतर्गतच राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. त्याचे तीन हप्ते आतापर्यंत देण्यात आले. मात्र, जूनमध्ये पेरणीसाठी राज्याचा हप्ता मिळेल अशी आशा होती. मात्र, पाच महिने झाले, तरीही हप्ता मिळालेला नाही.

"राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता फेब्रुवारीनंतर मिळालेला नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी उसने-उधार करून, कर्ज काढून पैसे घेतले आहेत. सध्या पेरणीनंतर आंतरमशागत आणि खते, कीटकनाशके फवारणीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आस लागली आहे."- रूपेश पागोटे, शेतकरी

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाbhandara-acभंडारा