शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या धानाच्या पेंढ्या

By admin | Updated: October 16, 2015 01:08 IST

चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत प्रभाग समिती बैठकीत अधिकाऱ्यांना धानाच्या पेंढ्या देऊन शेतकऱ्यांनी दुष्काळाची समस्या अवगत देण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांची व्यथा : बैठकीला महसूल कर्मचाऱ्यांची दांडीतुमसर : चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत प्रभाग समिती बैठकीत अधिकाऱ्यांना धानाच्या पेंढ्या देऊन शेतकऱ्यांनी दुष्काळाची समस्या अवगत देण्याचा प्रयत्न केला. चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांच्या समस्या एकाचवेळी सोडविता याव्यात यासाठी शासनाने प्रभाग समिती गठित केली. जिल्हा परिषद सदस्य त्या समितीचे अध्यक्ष असून तालुक्यातील सर्व विभागप्रमुख त्या समितीचे सदस्य असतात. दर तीन महिन्यात बैठक घेऊन एकाच वेळी नागरिकांचे समस्या निकाली काढा, असे निर्देश आहेत. त्यानुसार चिखला क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता सोनवाने यांनी १० आॅक्टोबर रोजी गोबरवाही येथील नागझिरा देवस्थानात प्रभाग समितीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख, महावितरण, कृषी, पोलीस, पाणीपुरवठा, आरोग्य आदी विभागाचे प्रतिनिधींनी उपस्थित होते. यावेळी व्यथा मांडण्यासाठी चिखला जिल्हा परिषद क्षेत्रातील सीतासावंगी, चिखला, राजापूर, खंदाळ, गुढरी, मोकोटोला, भोंडकी, चिचोली, धुटेरा, घानोड आदी गावातून आलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धानाच्या पेंढ्या देऊन दुष्काळाची समस्या अवगत करुन दिली. या परिसरात दुष्काळाची स्थिती ओढवली असताना जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जिल्ह्यात कुठेही नाही तेवढी समस्या तुमसर तालुक्यात चिखला परिसरात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ही बाब महसूल विभागाच्या लक्षात असल्यामुळे या बैठकीत शेतकरी रोष काढतील या भीतीमुळे महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे महसूल विभागाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची प्रतिक्रिया दिलीप सोनवाने, वामन गाढवे, श्रीराम गौपाले, साधू वघारे, नरेंद्र गौपाले, सुरेश काळसर्पे, बाबू हेडावू, रामदास बारागवणे या शेतकऱ्यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)