शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

ऊस तोडणीसाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:15 IST

परसवाड्यातील शेतकरी हतबल : मजुरीअभावी कामगार पळाले, परसवाडातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उभ्या ऊसपिकांची तोडणी झाली नसल्याने शेतकऱ्यांनी उसाचे पीक जाळायचे काय, असा प्रश्न परसवाडा गावातील संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. उन्हाळ्यात लवकर उसाची कापणी आणि उचल झाली नसल्याने या परिसरातील ४०० एकरांतील शेतकऱ्यांना फटका बसण्याची वेळ आली आहे. मानस अॅग्रो प्रा. लि. देव्हाडा ऊस कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

वैनगंगा नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या परसवाडा शेतशिवारात उसाची लागवड केली जाते. या परिसरात ६०० ते ७०० एकर शेतीत शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घेतले आहे. या सर्व उसाची उचल होण्याची अपेक्षा असताना मानस अॅग्रो कारखान्याने फक्त १५० ते २०० एकर शेतीतील उसाची उचल केली आहे. उर्वरित ४०० एकर शेतीत उसाचे पीक तोडणीच्या प्रतिक्षेत आहे.

ऊस तोडणीसाठी नकारऊसतोड कामगारांना वेतन न मिळाल्याने कामगारांच्या टोळ्या गावाकडे परतल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चिंता निर्माण झाली आहे. येत्या १० दिवसांत उसाची तोडणी आणि उचल झाली नाही तर, संपूर्ण उभे पीक जाळून टाकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याला निवेदनातून दिला आहे. त्यात अंकुश हुड, अरुण राऊत, अतुल नंदरधने, नरेश राऊत, बाळकृष्ण विठुले, वसंता पांडे, गंगाधर गौपाले, अनिल लांडगे, गोविंदा शेंडे व ३५ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासलेजवळपास ४०० एकर शेतीत उस उभा आहे. लवकरच उन्हाळा सुरु होत आहे. वेळीच कापणी आणि उचल झाली नाही तर वजनात घट होण्याची शक्यता असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कारखान्यात प्रती टनामागे जळीत कापले जाते. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत असतो. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

मजुरांकडून वाढीची मागणीमजुरांनी ऊस तोडणीसाठी थेट दरात वाढीची मागणी केली आहे. प्रति टनामागे २०० रुपयांची वाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झेपण्यासारखी नाही. यासंदर्भात कारखान्यात तक्रार केली तर, कारखाना व्यवस्थापन दाद देत नाही. यामुळे वाढीव मजुरी दिली नाही तर शेताततच उस वाळण्याची भीती आहे. ती दिली तर आर्थिक बजेट कोलमडण्याचा धोका आहे. यामुळे करावे तरी काय, अशी अवस्था आहे.

जळीत उस कपातीला शेतकऱ्यांचा विरोधजळीत उस कारखान्यात गेल्यास यापोटी कारखान्याकडून २० टक्के रक्कम कपात केली जाते. मात्र याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. उसाचे फड जाळल्याशिवाय तोडणी करत नाहीत. यामुळे होणारे नुकसान आमचेच असते. तरीही कारखान्याकडून पुन्हा २० टक्के रक्कम कपातीचे धोरण अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच कधी सुरू तर कधी बंद अशी कारखान्याची अवस्था आहे. यामुळे शेतकरी संतापले आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीbhandara-acभंडाराFarmerशेतकरी