शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

तुमसर तालुक्यातील दावेझरी (आंबागड) येथील शेतकऱ्यांच्या शेत शिवारातून बावनथडी प्रकल्पाचे उप कालवा (नहर) बनविण्यात आले आहे. गत अनेक वर्षांपासून कालवा (नहर) बनून तयार आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. कित्येकदा कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजघडीला कोरोना विषाणूने देशासह राज्यात धुमाकूळ घातलेला आहे.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : दावेझरी येथील एकही शेतकऱ्यांना मोबदला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या बावनथडी प्रकल्पाचा उपकालवा तालुक्यातील दावेझरी (आंबागड) येथील शेतकºयांच्या शेतशिवारातून शेतकऱ्यांना जमिनीचा दुप्पट मोबदला मिळणार, या अटीवर तयार करण्यात आले. मात्र अनेक वर्षे लोटली तरी जमिनीचा दुप्पट मोबदला तर सोडाच एक छदामही आतापर्यत मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तात्काळ प्रभावाने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.तुमसर तालुक्यातील दावेझरी (आंबागड) येथील शेतकऱ्यांच्या शेत शिवारातून बावनथडी प्रकल्पाचे उप कालवा (नहर) बनविण्यात आले आहे. गत अनेक वर्षांपासून कालवा (नहर) बनून तयार आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. कित्येकदा कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजघडीला कोरोना विषाणूने देशासह राज्यात धुमाकूळ घातलेला आहे. परिणामी शेतकरी व जनसामान्य नागरिकांचा रोजगार हिसकावून बसलेला आहे. आधीच कंबरडे मोडले असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न झाला आहे.शेतकऱ्यांची होत असलेली होरपळ व अन्यायाबाबतची संपूर्ण हकीकत सांगून शासन स्तरावर तात्काळ प्रभावाने कारवाई करून दावेझरी येथील गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींनीचा मोबदला देण्यात यावा, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांना देण्यात आले.शिष्टमंडळात नगराध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा महामंत्री मुन्ना पुंडे, जय मोरे, समाजसेवक राजकुमार टेकाम आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या