शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रांवर लिमिटच्या अडचणीमुळे शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:27 IST

Bhandara : तातडीने लिमिट वाढवण्याची सरकारकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्ह्यातील अनेक सरकारी धान खरेदी केंद्रांवर सध्या शासनाच्या निर्धारित मर्यादा (लिमिट) पूर्ण झाल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली आहे. या परिस्थितीमुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विकण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक व मानसिक ताण वाढला आहे.

अनेक केंद्रांवर 'धान खरेदीची लिमिट संपली' असा फलक लावण्यात आला असून, शेतकऱ्यांना नोंदणीनंतरही धान विकता येत नाही. काही शेतकरी अनेक दिवस ट्रॅक्टर, बैलबंडी घेऊन केंद्राबाहेर उभे आहेत. धान विक्री न झाल्यामुळे कर्जाची परतफेड अडकली असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बोनस मिळण्याची प्रक्रिया केवळ विक्री केलेल्या शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित आहे.

शेतकऱ्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासनाकडे धान खरेदीची लिमिट तातडीने वाढवावी, असा आग्रह धरला आहे. शासनाने केंद्रांना ज्या प्रमाणात नोंदणी झाली आहे, त्या प्रमाणात खरेदीची मर्यादा द्यावी व खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. शासनाने या समस्येवर तातडीने उपाय न केल्यास शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

धान साठवण्याची अडचणशेतकऱ्यांना राहण्यासाठीच सोयीची जागा नसताना आता धान साठवून ठेवायचा कसा, हा प्रश्न आहे. धान साठवण्यासाठी जागा व साधनसामग्रीचा अभाव असून, हवामानातील बदलामुळे धान खराब होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. पावसाळा असल्याने अडचण तातडीने समजून घेण्याची गरज आहे.

"भंडारा जिल्ह्यातील शेतकरी धान खरेदी केंद्रांवरील लिमिटच्या अडचणीमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन, खरेदीची मर्यादा वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा."- ठाकचंद मुंगुसमारे, अध्यक्ष, महाकाल संस्था, तुमसर

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी