शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्याची भन्नाट आयडिया; ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येऊ शकते. ३० मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता आहे. एकावेळी चार नोझलद्वारे फवारणी करता येते.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मजूर टंचाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने भन्नाट आयडिया करून ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशक फवारणीचा यशस्वी प्रयोग केला. लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे बुधवारी एका शेतात प्रायोगिक तत्त्वावर फवारणी करण्यात आली. त्यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. वेळ, कीटकनाशक, पैसा आणि मनुष्यबळाची बचत होत असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात धानासोबतच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. फवारणीच्या कामाला तर कुणीही येत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी ड्रोनने फवारणी करण्याचा प्रयोग जेवनाळा येथील प्रगतशिल शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात करण्यात आला. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, पर्यावरण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, तालुका कृषी अधिकारी पात्रीकर, मनिषा नागलवाडे, गौरव तुरकर, तहसीलदार महेश शितोळे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर, विनायक बुरडे, सरपंच वैशाली बुरडे, प्रशांत गिऱ्हेपुंजे, कल्पना सेलोकर, प्रशांत गिऱ्हेपुंजे, संदीप हिंगे, नरेंद्र बुरडे, सविता तिडके, बबलू निंबेकर, दामाजी खंडाईत, इद्रिस लद्धानी, हेमाजी कापसे, नीळकंठ कायते यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली.

माऊली ग्रीन आर्मीचे सहकार्य- जेवनाळा येथील शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात किसान ड्रोन, माऊली ग्रीन आर्मी, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती आणि आयोटेक वर्ल्ड एरिगेशनच्यावतीने हा प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्यात आला. टमाटर, मिर्ची आणि वांग्याच्या शेतीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. अगदी कमी वेळात आणि कमी मनुष्यबळात ही फवारणी होत असल्याचे दिसत होते.जिल्हा बँक देणार कर्ज सुविधा- मजूर टंचाईवर सामना करण्यासाठी शेतकरी किंवा बचतगट ड्रोन खरेदी करणार असली तर त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज सुविधा उपलब्ध करुन देईल, असे बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य- ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येऊ शकते. ३० मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता आहे. एकावेळी चार नोझलद्वारे फवारणी करता येते.

 

टॅग्स :Farmerशेतकरीtechnologyतंत्रज्ञान