शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता संकलनासाठी गेला, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 4, 2024 17:11 IST

Bhandara : तेंदूपत्ता आणण्यासाठी जंगलालगत गेलेल्या इसमावर अस्वलीने केला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलालगत गेलेल्या इसमावर अस्वलीने हल्ला चढवुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना ४ मे रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मुर्झा येथे घडली आहे. रमेश हगरू आंबेडारे (५७, मुर्झा) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यात तेंदुपत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घटनेच्या दिवशी घटनेतील जखमी रमेश आपल्या पत्नीसह गावालगतच्या जंगल शिवारालगत तेंदुपत्ता संकलनासाठी गेला होता. जंगलात असलेल्या तेंदूच्या झाडाची पाने तोडत असतानाच अस्वलाने रमेशवर हल्ला चढविला. यात रमेशच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.

ही घटना रमेशच्या पत्नीसह परिसरात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या अन्य मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी रमेशकडे धाव घेत अस्वलाला घटनास्थळावरून हुसकावून लावले. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी असलेल्या रमेशला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रय ठाकरे यांनी जखमीवर उपचार केले. जखमी रमेशची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला होताच वनपरिक्षेत्राकारी रुपेश गावित व अन्य वन कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात भेट देत घटनेचा पंचनामा केला. जखमीला शासकीय मदत मिळवून देण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांनी आश्वासन दिले.

तेंदूपत्ता संकलन करताना दक्षता घेण्याचे आवाहनतेंडूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांनी जंगलामध्ये सकाळच्या सुमारास तेंदूपत्ता तोडण्याकरिता जाऊ नये. जायचे असल्यास जंगलात जाताना एकटे जाण्याऐवजी समूहाने जावे. पहाटेच किंवा सकाळच्या सुमारास अन्य प्राणी जागृत झालेले असतात अशावेळी ते हल्लाही करू शकतात त्यामुळे मजुरांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन गटागटात किंवा समूहाने जावे असे आवाहन लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ता मानबिंदू दहिवले व वनरक्षक खंडागळे यांसह नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा