शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने फिरविली पाठ शेतकरी झाला चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी रोवणी करुन २० दिवस झाले पण पाऊस नसल्याने त्यांची सुध्दा रोवणी वाळण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देरोवणी खोळंबली : तिरोडा तालुक्यातील काही गावे पाण्यापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा बुज. : तिरोडा तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची रोवणी आटोपली आहे. परंतु ज्या शेतकºयांकडे सिंचनाचे कुठलेच साधन त्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी रोवणी करुन २० दिवस झाले पण पाऊस नसल्याने त्यांची सुध्दा रोवणी वाळण्याच्या मार्गावर आहे.यावर्षी शेतकरी व शेतमजूर कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झाला आहे. तीन महिने हाताला काम नाही. यात पावसाळा लागताच शेतीच्या कामाकडे शेतकरी वळला. कर्ज काढून शेतीसाठी बियाणे खरेदी करुन पेरणी केली. धानाची रोपे आणि धानाची रोवणी करावी अशातच पावसाने दडी मारली.आठ ते दहा दिवसांपासून परिसरात पाऊस झाला नाही. त्यात धानाचे पऱ्हे सुद्धा वाळले असून कचऱ्याचे प्रमाण वाढले. काही ठिकाणी जवळच्या शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सोईमुळे परे लावले आणि आजूबाजूचे शेत पडीक आहेत. शेतकरी आकाशाकडे दमदार पाऊस होईल आशेने दररोज आकाशाकडे नजर लावून असतो. मात्र दररोज त्याच्या पदरी निराशाच येत आहे.कुठे गरज नसताना दिले जात आहे पाणीखैरबंधा जलाशयाला लागून असलेल्या गावात शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाण्याची गंगा वाहत आहे. ज्यांची रोवणी झाली त्यांना पाण्याची गरज नसताना सुद्धा पाणी दिल्या जात आहे. शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांच्या रोवणीसाठी पाणी अजूनपर्यंत मिळाले नाही. सोनेगाव, सेजगाव, बिबीटोला, नहरटोला, डब्बेटोला, दवनीवाडा, देऊटोला, झालूटोला, कारुटोला याच भागात पाणी दिल्या जात आहे. मात्र अर्जुनी, करटी, इंदोरा बुज., परसवाडा या कालव्याला अजूनपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. खैरबंधा जलाशयाचे मुख्य अभियंता यांनी शेतकऱ्यांच्या समस्येची तातडीने दखल घेऊन रोवणीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. जुलै महिना संपत आला असून ऑगस्ट महिन्याला सुरूवात होणार आहे. पण अद्यापही ५० टक्के रोवणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.खैरबंधा जलाशयाचे पाणी केव्हा मिळणार१३ जुलैला धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पातून खैरबंधा जलाशयात पाणी सोडण्यात आले. खैरबंधा जलाशयातून शेतकºयांना रोवणी लावण्यासाठी पाणी सोडण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु जलाशयाच्या शेवटच्या टोकावरील इंदोरा बुजरुक, करटी बुज.,करटी खुर्द, बिहिरीया, बघोली, परसवाडा, खैरलांजी, अर्जुनी, सावरा, पिपरीया, गोंड मोहाळी, किंडगीपार या गावातील कालव्यात अद्यापही पाणी पोहचले नाही.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी