शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; आठ दिवसातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2022 12:51 IST

सीटी-१ वाघाची १३ वी शिकार

दयाल भोवते

लाखांदूर(भंडारा) : आठवडाभरापूर्वी इंदोरा जंगलात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाने शुक्रवारी पुन्हा एका जणाचा बळी घेतला. शेतातील पिकाची पाहणी कराण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केले. ही घटना शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शेतशिवारात घडली. या वाघाची ही १३ वी शिकार असून तालुक्यातील चौथी घटना होय.

तेजराम बकाराम कार (४५) रा. कन्हाळगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ते गावातील मनोज शालिक प्रधान (३०) याच्यासोबत शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पिकाची पाहणी करून शेळ्यांसाठी चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडावयास गेलेल्या तेजरामवर वाघाने अचानक हल्ला चढविला. हा थरार पाहून मनोजने प्रचंड आरडा ओरड केली. घटनेची माहिती मोबाईलवरून गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, गावकऱ्यांनी  वनविभागाला माहिती देताच वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले, भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई कन्हाळगावकडे रवाना झाले. पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. 

लाखांदूर तालुक्यातील चौथी घटना

लाखांदूर तालुक्यात वर्षभारात. सीटी-१ वाघाने चौघांचा बळी घेतला. त्यामध्ये २७ जानेवारी रोजी दहेगाव जंगलात सरपण आङ्यासाठी गेलेला लाखांदूर येथील प्रमोद चौधरी (५४),  ४ एप्रिल रोजी इंदोरा येथील जंगलात मोहफूल गोळा करण्यासाठी गेलेला जयपाल कुंभरे (४०), आठवडाभरापूर्वी २१ सप्टेंबर रोजी विनय खंगन मंडल (४५) रा. अरुणनगर आणि शुक्रवारी तेजराम कार या शेतकऱ्या ठार केले. या वाघाने भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या ४ जिल्ह्यात १३ जणांचा बळी घेतला आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरीDeathमृत्यूbhandara-acभंडारा