सरकारकडून सामान्य जनतेचे शोषणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:35 PM2017-09-23T23:35:46+5:302017-09-23T23:35:57+5:30

मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. भाजप सरकार खोटारडे असून सामान्य जनता, ......

The exploitation of the general public by the government | सरकारकडून सामान्य जनतेचे शोषणच

सरकारकडून सामान्य जनतेचे शोषणच

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. भाजप सरकार खोटारडे असून सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी, युवकांचे सरकारद्वारा नवनवीन कायदे निर्माण करून शोषण करीत आहे. तेव्हा सरकारला धडा शिकविण्यासाठी गाव पातळीवरून समोर येणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोमाने काम करा, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष बाबूराव बागडे, सभापती नरेश डहारे उपस्थित होते.
यावेळी खा.पटेल म्हणाले, सध्याचे सरकार हे देशात आर्थिक संकट निर्माण करीत आहे. विरोधक प्रफुल पटेलांविषयी अपप्रचार करून कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करीत आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. भंडारा, गोंदिया जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी हे जनता समस्याग्रस्त असताना केवळ पळपुटपणाचे धोरण अवलंबत आहे. तेव्हा ग्रामपंचायतच्या निवडणुकातून त्यांना धडा शिकवा, मी नेहमीच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जनतेसाठी काम करणार असल्याचे खा.पटेल यांनी सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महिला पदाधिकाºयांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धनंजय दलाल यांनी तर आभारप्रदर्शन अभिषेक कारेमोरे यांनी केले.
या बैठकीत अ‍ॅड.विनयमोहन पशिने, विजय डेकाटे, डॉ.श्रीकांत वैरागडे, लोमेश वैद्य, कल्याणी भुरे, नितीन तुमाने, धनेंद्र तुरकर, वासुदेव बांते, उर्मिला आगाशे, शुभांगी राहांगडाले, विठ्ठल कहालकर, दामाजी खंडाईत, मधुकर सांभारे, देवचंद ठाकरे, स्वप्नील नशिने, दिपक चिमणकर, अविनाश ब्राम्हणकर, तोमेश्वर पंचभाई, मकसुद पटेल, हितेश सेलोकर, डॉं.विकास गभणे, शैलेश मयूर, अंगराज समरीत, रेखा ठाकरे, रिता हलमारे, संजय केवट, भगीरथ धोटे, सुनिल शहारे, उत्तम कळपते गीता माटे जि.प. सदस्य, सुनिल घोगरे, सुरेश रहांगडाले, योगेश सिंगनजुडे, दिपक चिमणकर, ज्योती खवास, लोमेश वैद्य, अमर उजवणे, राजू पटेल, उमेश तुरकर, बाबूराव मते, यादोराव भोगे, मुकेश बावनकर, दिलीप सोनवाने, ज्योती टेंभुर्णे, उर्मिला आगाशे, धनू व्यास, सुरेश बघेल, किशोर चौधरी, उमेश ठाकरे, रामभाऊ गाजीमवार, बाबा सय्यजादा, सुनिल घोगरे, मोहन डोरले, विनोद बाभरे, शुभांगी खोब्रागडे, सुनिलसाखरकर, प्रभाकर सपाटे, जुमलाताई बोरकर न.प. सदस्य, प्रेरणा तुरकर, मधुकर चौधरी, सुरेश सावरबांधे, मदन रामटेके, छोटू बाळबुधे, अक्षय रामटेके, सुरेश कापगते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The exploitation of the general public by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.