१६ तास वीज पुरवठ्याची ग्वाही : अन्यथा मागणीसाठी जनहीत याचिकेची तयारीलाखनी : तालुका कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण व धरणे आंदोलनाला २६ आॅगस्टला आमदार बाळा काशीवार यांनी भेट देवून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना कृषी पंपाला १६ तास वीज पुरवठा देण्यासंंबंधाची ग्वाही दिली. मागणी पूर्ण न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटने मार्फत जनहित याचिका दाखल करून भारनियमन बंद करण्याचा लढा चालू राहील या निर्णयावर शेतकऱ्यांच्या हस्ते निंबू पाणी घेवून उपोषण व आंदोलनाची सांगता करण्यात आली.धान पिकाकरिता २४ तास वीज पुरवठा का करण्यात येऊ नये, ८० टक्के जनताही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती व्यवसायाकरिता गरज असलेली कृषी पंपावरील भारनियमण कायम स्वरूपी बंद करून २४ तास विज पुरवठा करावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष धनंजय लोहबरेसह शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान आमदार बाळा काशीवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कृषीपंपाला कमीत कमी १६ तास वीज पुरवठा देण्यात यावा, याकरिता प्रयत्नशिल राहून तो हक्क शेतकऱ्यांना मिळावा याकरिता सरकारकडे विषय मांडून हा प्रश्न पूर्ण करण्याची ग्वाही दिली. अखेर आज तहसील कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेमार्फत सुरू असलेल्या साखळी उपोषण व आंदोलनाची उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते निंबू पाणी पिऊन उपोषण सोडण्यात आली. यावेळी उर्मिला आगासे, धनंजय लोहबरे, मनोज पटले, कंदलाल काडगाये, संजय रामटेके, बबलु कच्छवाह, सतीश बिसेन, दिपक काडगाये, नंदलाल काडगाये, दिपक काडगाये, ताराचंद टिचकुले आदी पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या उपोषणाची सांगता
By admin | Updated: August 27, 2016 00:23 IST