शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विद्यमान सरकार उद्योगपती व व्यापाऱ्यांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:55 IST

भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : मासळ येथे जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी जनजागृती मेळावा व एटीएमचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन. सद्याच्या सरकारने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद केली. अनेकदा या सरकारला याविषयी माहिती देऊन शिष्यवृत्ती सुरु करण्याची मागणी देखील केली. मात्र सध्याची सरकार ही गोरगरिबांची सरकार नसून ही मोठे उद्योगपती व व्यापाºयांची सरकार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.तालुक्यातील मासळ येथे रविवारला भंडारा जिल्हा बँकेच्या वतीने एटीएमचे उद्घाटन व शेतकरी जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री विलास श्रूंगारपवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश डोंगरे, इंजी.सुरेश ब्राम्हणकर, मनोहर महावाडे, जिल्हा प.सदस्या शुद्धमता नंदागवळी, सरपंचा सवीता लेदे, जि.प.सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, सत्यवान हुकरे, सदाशीव वलथरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सेवक वाघाये यांनी भाजप सरकारने ओबीसी समाज आणि बहुजन समाजाचे पार वाटोळे केले आहे. या सरकारने घोषणा केली की, दरवर्षी २ कोटी नोकºया उपलब्ध करुन देणार, परंतु प्रत्यक्षात मात्र यांची पाटी कोरीच राहीली आहे. ओबीसी समाजाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष नात्याने ओबीसी समाज व बहुजन समाजाच्या लढा लढत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचत, आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर असून शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. एटीमचे उद्घाटन करण्यासाठी एकत्रीत आलो असलो तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. या परिसरातील शेतकरी हा कधी ओला तर कधी सुक्या दुष्काळाने पार खचला आहे. ज्याच्या खिशातच पैसे नसतील तर एटीएम मधून पैसे कुठून काढणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. संचालन निशाद लांजेवार यांनी तर, आभार उदय भैय्या यांनी केले. कार्यक्रमासाठी राकाँ तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, सरपंच उत्तम भागडकर, रतीराम मेंढे, छगण गोंडाणे, देवा राऊत, सुभाष खीलवानी यांनी सहकार्य केले.