शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

वाचन प्रेरणा दिवस उत्साहात

By admin | Updated: October 18, 2015 00:16 IST

भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईलमॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

भंडारा : भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईलमॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळेत अखंड पुस्तक वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय सामाजिक संघटना शासकीय कार्यालये आणि निमशासकीय कार्यालयातही जयंती साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले विद्यालय, बेलाभंडारा : बेला येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस मुख्याध्यापक मंगर ढेंगे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. या कार्यक्रमांतर्गत गं्रथालयातून आवडीचे पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला देण्यात आले. याप्रसंगी स्वच्छतेचे महत्व पटवून देत जागतिक हात धूवा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. जीएनटी कॉन्व्हेंट गणेशपूर भंडाराभंडारा : गणेशपूर येथील जीएनटी कॉन्व्हेंटमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शिल्पा बागडे होते. अतिथी म्हणून लीना मेश्राम व संध्या कळंबे उपस्थित होत्या. याप्रसंगी अनुराग जाधव नयन उके, वेदांत मेहर, अवनी नंदेश्वर, साक्षी बान्ते, रुझान कोटांगले, नावन्या थोटे, ओमिनी खंडाते, समिक्षा मेश्राम, अंशुल निपाने, अमित निनावे विद्यार्थ्यांनी भाषण व समूहगीते सादर केले. संचालन वासुदेव मदारकर यांनी तर आभारप्रदर्शन फाजेल शेख यांनी केले. कार्यक्रमाकरिता कविता बांते, हर्षवीणा गजभिये, लक्ष्मीकांता मस्के, नेहा मोरस्कर, रोजीया बंसोड, सेलोकर, प्रियंका भोयर, शारदा साखरे, सुनिता चौधरी यांनी सहकार्य केले.जिल्हा परिषद शाळा राजेदहेगाव भंडारा : राजेदहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणादिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमना सैयद मुख्याध्यापीका, प्रमुख अतिथी म्हणून सुलोचना दिघोरे शाळा व्यवस्थापक समिती रामप्रसाद मस्के, गोपाल घाटोळे, एम. जी. चोपकर उपस्थित होते. वाचन प्रेरणा दिनाचे महत्व रामप्रसाद मस्के यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापिका आमना सैय्यद व गोपाल घाटोळे यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील ग्रंथालयात उपलब्ध पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांनी वाचन केले. संचालन मीना राजू मंच सदस्य उर्वशी वंजारी हिने तर आभारप्रदर्शन जयेश उके यांनी केले.राष्ट्रीय विद्यालय भंडाराभंडारा : राष्ट्रीय विद्यालय भंडारा येथे मुख्याध्यापक रत्नदीप मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक उपस्थित होते. संचालन जुबेर कुरैशी व आभार अल्का हटवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक अनिल कापटे, ज्योती मुळे, पराग शेंडे, भुषण फसाटे, राहुल बावनकुळे, हरिचंद्र चव्हाण, वर्षा ठवकर, रेखा गिऱ्हेपुंजे, श्रीराम शहारे, गंगाधर मुळे, शेखर थोटे, राजेश रघुते, सरोज भांडारकर यांनी सहकार्य केले.सर्वांगीण शिक्षण विद्यालय पिंडकेपार पिंडकेपार : येथील सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.बी. गोमासे होते. अतिथी म्हणून डी.एस. डोंगरे, व्ही. आर. मारवाडे उपस्थित होते. प्राचार्य गोमासे व डोंगरे यांनी कलाम सामान्य जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी हातधुवा दिनाचे निमित्त साधून जेवणापुर्वी हात स्वच्छ ठेवायचे यावर मार्गदर्शन करण्यात आले. मारवाडे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले. प्रास्ताविक टी.डी. कापगते यांनी तर संचालन पी. एम. पंधरे यांनी केले. आभार बी.के. दोनोडे यांनी मानले. भगिरथा भास्कर हायस्कूल टवेपारभंडारा : टवेपार येथील भगिरथा भास्कर हायस्कूलमध्ये अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. के. मून होते. यावेळी मून, बनकर, बाळापूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कथा नाटके उद्बोधनपर मासिके देवून त्याचे वाचन करण्यात आले. संचालन रामटेके यांनी तर आभारप्रदर्शन सार्वे यांनी केले.पोलीस प्राथमिक शाळा भंडाराभंडारा : स्थानिक पोलीस प्राथमिक शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका दीपिका ढेंगे होत्या. अतिथी म्हणून शिल्पा बागडे उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कलाम यांच्या जीवनावर भाषणे दिली व समूहगीत सादर केले. कलाम यांच्या व्यक्तिमत्वामधून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्याकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन मुख्याध्यापक ढेंगे यांनी यावेळी केले. यादिवशी आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविले व वर्षभर स्वच्छता पाळण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलारीवरठी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एकलारी येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे वाचन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक विलास तिडके, कुसुमलता वाकडे, दुर्गा कृपाण, विजया हटवार व परसराम बारई उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळा आमगाव (दिघोरी)आमगाव (दिघोरी) : येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेतील वाचनालयातील पुस्तके वाचन करुन वाचन पे्ररणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी जागतीक हातधुवा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता चौधरी होत्या. अतिथी म्हणून शाळा शिक्षण समिती उपाध्यक्ष ज्योती भालाधरे मनिषा सार्वे, आय.डी. देशमुख हे होते. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक शरद लोंवार यांनी केले. संचालन अनंता गावंडे यांनी तर आभारप्रदर्शन कुंदा बानाईत यांनी केले. कार्यक्रमासाठी सहायक शिक्षक उत्तम इलमे, युवराज गिऱ्हेपुंजे, अनमोल रंगारी, छाया धांडे, नम्रता राठोड यांनी सहकार्य केले.पार्वताबाई मदनकर महाविद्यालय वरठी वरठी : स्व. पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय वरठी येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रा. रजनी भुरे, प्रा. संगिता वखालकर, चेतन केवट व सोनु तांबेकर होते.जिल्हा परिषद हायस्कूल पालांदूरपालांदूर : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये वाचू आनंदे हा कार्यक्रम घेतला. यावेळी प्राचार्य एच. एस. मडावी, प्रा. सुधाकर ठोणे, एच. डी. बडोले, विकास लांजेवार, व्ही. व्ही. भोयर यांनी मार्गदर्शन केले. संचालन प्रा.विलास लांजेवार, आभारप्रदर्शन सुधाकर ठोणे यांनी केले. याप्रसंगी स्वच्छतेचे महत्व पटवून देत हात धूवा दिनानिमित्त हात धुण्याचे विविध प्रात्याक्षिके शिक्षक अंबिर वंजारी यांनी करुन दाखविले. याप्रसंगी प्राचार्य एच. एम. मडावी, प्रा. विलास लांजेवार, आर. बी. पालांदूरकर, एच.डी. बडोले, व्हि. व्ही. भोयर, अरुण गायधने उपस्थित होते. चैतन्य कला महाविद्यालय बाम्पेवाडाबाम्पेवाडा : येथील चैतन्य कॉन्व्हेंट व चैतन्य कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन तसेच हात धुवा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य देवानंद गोमाजी मडामे होते. अतिथी म्हणून प्रा. खुशाल चांदेवार, प्रा. तुळशीराम वंजारी, नंदा सोनवाने, रोहिणी माडामे, प्रकाश थेर, खुशाल उके, सोनकुसरे उपस्थित होते. संचालन रोहिणी गणविर हिने तर आभार रुपाली आजवर हिने मानले.वाघाये विद्यालय लाखनीलाखनी : स्थानिक निर्धनराव पाटील वाघाये महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला मृणाल मुनीश्वर, मालन खोब्रागडे, प्राचार्य एस.एस. शेंडे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.यु.पी. शहारे यांनी तर संचालन प्रा.गणेश कापसे आणि आभारप्रदर्शन प्रा. भोयर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा.पुण्यशील टेंभुर्णे, प्रा.देवघरे, प्रा.संजय नंदेश्वर, प्रा.शिल्पा फुलबांधे उपस्थित होते. (लोकमत चमू)