शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकजन ग्राहकच

By admin | Updated: March 16, 2017 00:30 IST

जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकजन हा ग्राहकच असतो. म्हणून वस्तु खरेदी कतांना वस्तु चांगल्या दजार्ची आहे काय,....

मनोहर चिलबुले : जागतिक ग्राहक दिन उत्साहात भंडारा : जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकजन हा ग्राहकच असतो. म्हणून वस्तु खरेदी कतांना वस्तु चांगल्या दजार्ची आहे काय, गॉरंटी आहे काय, याकडे ग्राहकांचा कल असावा. तो वरील निकषावर खरा निघाला नाही तर तात्काळ ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अर्ज दाखल करावा, असे प्रतिपादन ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष मनोहर चिलबुले यांनी केले. जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम सामाजिक न्यायभवन येथे साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे होते. पाहुणे म्हणून तहसिलदार संजय पवार, पणन अधिकारी पोहनकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी संजय रामटेके उपस्थ?ित होते. यावेळी मनोहर चिलबुले म्हणाले, ग्राहक संरक्षण कायदयात वस्तु बदलून देण्याची तरतूद आहे. तसेच ग्राहकांना नुकसान भरपाई सुध्दा देण्यात येते. वाहनाची चोरी झाल्यास तात्काळ सबंधित संस्थेला कळवायला पाहिजे. ४८ तासात सदर दावा न केल्यास कंपनी विमाधारकाचा दावा विमा कंपनी खारीज करु शकते. तसेच पॉलीसी वरील अटी व शर्ती ग्राहकांनी पहावयास हव्या व अटी व शर्ती मंजूर नसल्यास १५ दिवसात पॉलीसी परत कराव्या. त्यामुळे फसगत होणार नाही. अनकेदा लोभापायी फसगत होण्याची शक्यता असते म्हणून ग्राहकांनी लोभीपणा सोडावा व सतर्कता बाळगावी. पक्क्या बिलाचा आग्रह धरावा. एखादी घटना घडल्यानंतर दोन वर्षाच्या आत ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल करावा, असेही त्यांनी सांगितले.तहसीलदार संजय पवार म्हणाले, ग्राहक चळवळ ज्या प्रमाणे दिसायला पाहिजे त्याप्रमाणे तीची वाटचाल दिसत नाही. त्यामुळे ग्राहकांची फसगत होत आहे. म्हणून आपले हक्क खरेदी करतांना बघावे. आपली पिळवणूक होऊ नये याकडे बघावे. आपले अधिकार व कर्तव्याची जाणीव ठेवावी. रमेश बेंडे यांनी ग्राहक चळवळीच्या इतिहासाची जाणीव करुन देतांना ग्राहकांचे सात अधिकार व सात कर्तव्य या विषयी माहिती दिली. नागरिकात सुज्ञता व जागरुकता असली पाहिजे. तसेच आपले अधिकार व कर्तव्याची जाणीव असली पाहीजे, असेही ते म्हणाले.(शहर प्रतिनिधी)