शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषदेतील कामकाज विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:30 IST

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्छा रिकाम्या : निवडणुकीमुळे दैनंदिन कामकाजाला ब्रेक

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा दिवाळी उत्सवाच्या काळात विधानसभेची निवडणूक आली. त्यामुळे अनेकांच्या कामकाजाची धावपळ वाढली. त्यातच दिवाळीनिमित्ताने अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी आपापल्या गावाची वाट धरत निघून गेले. आता दिवाळीचा सण आटोपल्यानंतर ४ नोव्हेंबरपासून नियमित कामकाजाला सुरुवात होईल, अशी जनसामान्यांची अपेक्षा होती. परंतु, आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांतील बहुतांश खुर्चा रिकाम्या पाहावयास मिळाल्या. काहीजण सुट्टयांवर तर काही निवडणुकीच्या कामावर असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेत दिवाळी फीवर अद्यापही कायम आहे. दिवाळीला गुरुवारपासून सुरुवात झाली. शुक्रवारी लक्ष्मीपूजन, शनिवारी गायगोधन आणि रविवारी भाऊबीज होती. त्यामुळे रविवारपर्यंत सुट्टया झाल्यानंतर ४ नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे कार्यालये सुरू झाली. सलग सुट्टया आल्याने बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांचा आठवडाभराचा बेत आखला. ते गुरुवारपासून सुट्टीवर गेले असून, अद्यापही कार्यालयात परतले नाहीत. त्यामुळे मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत शुकशुकाट दिसून आला. हीच परिस्थिती अन्य शासकीय कार्यालयांतही होती. 

निवडणुकीच्या कामानिमित्त अधिकारी व कर्मचारी दौऱ्यावर असल्याचेही सांगण्यात आले. तर काही जणांची निवडणूक कामात ड्यूटी लवकरच लागणार असल्याचे कळविण्यात आले.

कामकाज नावापुरेतच, गप्पाच अधिक दिवाळीसाठी गेलेले अधिकारी य कर्मचारी सुट्ट्या संपवून परतले नाहीत. त्यातच निवडणुकांमुळे अधिकारी दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. परिणामी सर्वसामान्यांचे कामकाज विस्कळीत झाले. जे कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले, त्यातील मोजक्याच कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. काहीजण गप्पागोष्टीत गुंग होते. काही मोबाइलवर व्यस्त होते, तर काही परिसरात बाहेरील टपरीवर वेळ घालवत असल्याचे दिसले.

कामानिमित्ताने आलेले गेले परत शनिवार व रविवार असल्याने काही अधिकारी व कर्मचारी त्या अगोदरच म्हणजे गुरुवारपासूनच सुट्टीवर गेले. त्यामुळे सोमवारी या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून तरी कामकाज सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा फोल ठरली. मंगळवारी विविध कामानिमित्त जिल्हा परिषदेतील विविध कार्यालयांत नागरिक आलेले दिसून आले. पण, कामे न झाल्याने सायंकाळी निराश होऊन परत गेले.

मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी घालावे लक्षजिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीत ठेवण्याची जबाबदारी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची आहे. मंगळवारला कामकाज सुरु असताना अनेकांच्या खुर्चा रिकाम्या दिसल्या. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी खरंच निवडणुकीच्या कामावर आहेत, की सुट्टयांवर यासंबंधीची पाहणी करणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा