शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाच्या रात्रीही रेतीचा अवैध उपसा, पोलिसानी रात्र जागून पकडला टिप्पर

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: November 13, 2023 14:53 IST

पहाटे दाखल केला गुन्हा

भंडारा : लक्ष्मीपूजनाच्या रात्री सर्वजण उत्सवाच्या आनंदात असताना रेती चोरांनी मात्र टिप्परसह नदी घाट गाठून रेतीचा अवैध उपसा केला. पोलिसांना हे माहित पडताच त्यांनी संबंधित तिघांना रंगेहात ६ ब्रॉस रेतीसह टिप्पर जप्त करून पहाटे पालांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवारी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील मांगली(बांध) शिवारात करण्यात आली. फिर्यादी पोलिस शिपाई नितेश मलोडे यांच्या तक्रारीवरून पालांदूर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन शंकर हटवार (२६) व महेश मोहन पंचभाई(२७, दोन्ही आसगाव, ता. पवनी) तर, टिप्पर मालक चंदू अनिल तिघरे (२३,वलनी, ता.पवनी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रेतीची अवैधरित्या वाहतूक करणे, हा कायद्याने गुन्हा असला तरीही तस्कर खुलेआम अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत आहेत. पालांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ ठवकर हे रात्र गस्त तपासणी करीत असताना, त्यांना हायवा टाटा एम.एच. ३६. ए.ए. २२९६ या क्रमांकाच्या टिप्पर मधून सहा ब्रास रेतीची वाहतूक करताना मांगली शिवारात आढळून आला. परवाना मागितला असता तो टिप्पर चालकाजवळ आढळून आला नाही.

टिप्पर मालक चंदू तिघरे यांच्या सांगण्यावरून चालक मोहन हटवार यांनी रेतीची चोरी करून वाहतूक केल्याचे पंचासमक्ष सांगितले. जप्त केलेल्या रेतीची किंमत ३० हजार रुपये तर, टिप्परची किंमत ३० लाख रुपये सांगण्यात येते. एकूण ३० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला. आरोपींवर भादंवीच्या कलम ३७९,३४,१०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार वीरसेन चहांदे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार राजकुमार गायधने, पोलीस हवालदार ओमप्रकाश दिवटे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीbhandara-acभंडारा