शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

यंदाही शेतकरी संकटातून बाहेर येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST

शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी संकटाचाच सामना करावा लागतो. गत वर्षी सिंचनाअभावी धान पीक करपल्याने नुकसान झाले होते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान पिकाची लागवड केली. परंतु यावर्षीही असमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महिन्याभरापासून तुमसर तालुक्यात पाऊस बसरत असल्याने धान पीक धोक्यात आहे. किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलक्या प्रतीचे धान कापणी योग्य झाले आहेत.

ठळक मुद्देअतीपावसामुळे धान पिकांची नासाडी : सर्वेक्षण करून नुकसानभरपाईची सरपंचांसह शेतकऱ्यांची मागणी

तुलसीदास रावते ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : हलक्या प्रतीचे धान कापणी योग्य झाले आहेत, परंतु सततच्या पावसामुळे पिकांची नासाडी सुरू आहे. पीक घरी येऊ शकत नाही या विवंचनेत शेतकरी चिंतातूर झाला आहे. तातडीने पंचनामे करून पीक विमा व आर्थिक मदत देण्यात यावे , अशी मागणी तुमसर तालुक्यातील सरपंचांसह शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी संकटाचाच सामना करावा लागतो. गत वर्षी सिंचनाअभावी धान पीक करपल्याने नुकसान झाले होते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान पिकाची लागवड केली. परंतु यावर्षीही असमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महिन्याभरापासून तुमसर तालुक्यात पाऊस बसरत असल्याने धान पीक धोक्यात आहे. किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलक्या प्रतीचे धान कापणी योग्य झाले आहेत. परंतु पावसामुळे पिकाची कापणी करू शकत नाही, तर काही धानपीक अती पावसामुळे जमीनदोस्त झाले असून कुजण्याच्या स्थितीत आहेत.उच्च प्रतीच्या धानपिकाला कीडींचा प्रादूर्भाव वाढलेला आहे. अनेक शेतकºयांचे धानपीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केले आहे. पीक घरी येणार की नाही, या विवेचनेत शेतकरी चिंतातूर झाला आहे. हे सर्व सततच्या पावसामुळे झाल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांनी बँक, सावकार, हातउसने कुठून ना कुठून कर्ज काढून शेती सजविली आहे. शेतकºयांच्या डोक्यावर मोठे कर्जाचे ओझे असून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. काही शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे. त्यांना पीक विमा तात्काळ देण्यात यावे तर काही शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विमा काढलेला नाही, परंतु नुकसान झाली आहे, अशा सर्व शेतकºयांच्या पिकाची पाहणी करून आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी तुमसर तालुक्यातील बघेडाचे सरपंच प्रतिमा अशोक ठाकूर, पवनाराचे सरपंच रशीद शेख, चिचोलीचे सरपंच अनिता नेवारे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या धानपिकाचे सर्वेक्षण करण्यासाठी पुढकाराची गरज आहे.कोथुर्णा परिसराला अतिवृष्टीचा फटकाभंडारा : तालुक्यातील कोथुर्णा परिसराला अतिवृष्टीचा फटका बसला असून धानाच्या बांधीत सतत पाणी साचून राहिल्याने धानपीक सडत आहे. सर्वाधिक फटका शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचा बसला. शासनाने सर्वेक्षण करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी एका निवेदनातून केली आहे. कोथुर्णा परिसरातील लावेश्वर, खमाटा, टाकळी, कोथुर्णा, दाभा, खैरी, सोनुली, इंदूरखा, सिरसी आदी गावात गत महिनाभरापासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच शनिवारी रात्री आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला. यामुळे संपूर्ण धानपीक उध्वस्त झाले. धानाच्या ओंब्या गळल्या असून पावसाने पीक सडू लागले आहे. याप्रकरणी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी महेश जगनाडे, संजय मते, पंकेश काळे, राजकुमार उताने, सरपंच मधुकर भोपे, विजय ईश्वरकर, विलास खांदाडे, रसिका मोहतुरे, प्रमोद चोपकर, प्रवीण वाघमारे, रामकृष्ण मेश्राम, रामचंद्र डोये, सुखदेव तिवाडे, अशोक भोयर, कमल साठवणे, राधेश्याम भोयर यांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी