शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या खोलमारा घाटात इटियाडोहच्या पाण्याचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

पालांदूर जवळील मऱ्हेगाव ते खोलमारा घाटावर इटियाडोहचे पाणी शेत शिवारातून आल्याने भूजल पातळीसह पशुपक्ष्यांना ही मोठा आधार ठरला. शेतकऱ्यांनाही पीक वाचविण्याकरिता जलसाठ्यातील पाण्याची मोठी मदत शक्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात विदर्भात १,०००  मिलिमीटरच्यावर पाऊस कोसळतो. एवढा पाऊस ज्या भूमीत झाला तेथील पाणी पातळी निश्चितच समाधानकारक असते.

मुखरु बागडेलाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पूर्व विदर्भात पावसाळ्यातील पावसाचे प्रमाण अधिक असले तरी मार्च महिन्यानंतर नदी नाले कोरडे पडतात. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भंडारा जिल्ह्याला नवीन नाही. नदी काठावरील गावांनासुद्धा लीटरभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही टंचाई दूर करण्याकरिता महत्त्वाकांक्षी जलसाठे अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. पालांदूर जवळील मऱ्हेगाव ते खोलमारा घाटावर इटियाडोहचे पाणी शेत शिवारातून आल्याने भूजल पातळीसह पशुपक्ष्यांना ही मोठा आधार ठरला. शेतकऱ्यांनाही पीक वाचविण्याकरिता जलसाठ्यातील पाण्याची मोठी मदत शक्य आहे.पावसाळ्याच्या दिवसात विदर्भात १,०००  मिलिमीटरच्यावर पाऊस कोसळतो. एवढा पाऊस ज्या भूमीत झाला तेथील पाणी पातळी निश्चितच समाधानकारक असते. पावसाळ्यातील पाण्याचे योग्य नियोजन करून उन्हाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांना टप्प्याटप्प्याने सोडल्यास शेतीसह मुक्या जनावरांनासुद्धा मोठा आधार होतो. चूलबंद नदी घाट संपूर्णतः कोरडे झालेले आहे. गत महिन्याभरापासून चूलबंद खोरे संकटात आहे. सर्वच पिके चूलबंद खोऱ्यात उत्पादित होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेती पंपाच्या माध्यमातून सिंचन सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी संकटात येऊन शेत पिके निश्चितच समस्यात आहेत.भंडारा जिल्ह्यात साकोली शेजारील चूलबंद नदीवर निम्न ूचूलबंद प्रकल्प आहे. त्यातून कित्येक गावांची तहान भागविली जाते. त्या पाण्याचा लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकातील चुलबंद खोऱ्यातील गावांना होऊ शकतो. कोरड्या पडलेल्या जलवाहिन्या पुनर्जीवित होऊ शकतात. पशू पक्ष्यांसह जनावरांनाही मोठा आधार मिळू शकतो. किमान एप्रिल व मे या महिन्यात निम्न चूलबंदचे व गोसेखुर्द प्रकल्पातील नेरला उपसा सिंचन चे पाणी चूलबंद व तिला मिळणाऱ्या नाल्यांना सोडल्यास शेतीसह सर्वांना मोठा दिलासा मिळू शकतो.

चूलबंद नदी काेरडी- चूलबंद नदीला कोरड पडली आहे. अमाप रेती उपसानेही पाणी पातळी खालावलेली आहे. निम्न चूलबंद चे व गोसेखुर्द अंतर्गत नेरला लिफ्टचे पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. जल साठ्यातील पाणी चूलबंदला मिळाल्यास कित्येक गावे उन्हाळ्याच्या दिवसातही पाणीदार होतील हे विशेष!

 

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प