शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

चौंडेश्वरी मंदिरात १,४८१ ज्योतिकलशांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:25 AM

येथील माता चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्सवादरम्यान मंदिर परिसरात दुकाने सजली आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवाला प्रारंभ : दर्शनासाठी भाविकांची रीघ, दुकाने सजली

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : येथील माता चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्सवादरम्यान मंदिर परिसरात दुकाने सजली आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. यावर्षी चौंडेश्वरी मंदिरात १,४८१ ज्योतिकलशाची स्थापना करण्यात आली आहे.टेकडी या नावाने ओळखल्या जाणाºया मांडेसर-कान्हळगाव मार्गावर चौंडेश्वरी मातेचे मंदिर आहे. मंदिराला सहाशे वर्षाचा इतिहास आहे. जागृत देवी असल्याने या मंदिरात भाविक वर्षभर मातेचे दर्शन घ्यायला येतात. मागील दहा वर्षाच्या तुलनेत चौंडेश्वरी मंदिर सुविधांनी सज्ज व आकर्षक झाले आहे. देवस्थान समितीने धर्मशाळा, सभागृह, दुकानांची व्यवस्था, गोदाम बांधकाम, बगीचा, प्रसाधनगृह ही कामे केली आहेत. चौडेश्वरी मंदिर कमेटीच्यावतीने गावकºयांना शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा केली जाणार आहे. लोकोपयोगी व मंदिरातील कामांना प्राथमिकता दिली जात आहे.नवरात्रीमध्ये मोहाडी चौंडेश्वरी मंदिरात यात्रा भरत असते. येथे दर्शनासाठी विदर्भासह मध्यप्रदेशातील भाविकांची गर्दी असते. सकाळच्या आरतीला मंदिरात खूप गर्दी असते. नवरात्रोत्सवासाठी विविध कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. नऊ दिवस पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दसºयाच्या दिवशी मोहाडीत त्रिसंगम सोहळा साजरा केला जातो. रावणदहन, विद्यार्थी दुर्गा उत्सव मंडळाचा महाप्रसाद व मंदिरातील नवव्या दिवशीचे दर्शन करण्यासाठी हजारो लोक मोहाडी येथे सकाळपासून येतात. चौंडेश्वरी माता मंदिराच्या परिसरात नयनरम्य रावणदहनाचा कार्यक्रम होत असतो.जिल्हाधिकाºयांच्या हस्ते कलशपूजाचौंडेश्वरी मंदिरात १,४८१ ज्योतिकलशाचे दीप प्रज्वलन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते मंदिरात आले होते. यावेळी ज्योती कलशाचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनीही ज्योती कलशाची पूजा केली. यावेळी मोहाडी नगरपंचायतच्या सीईओ स्नेहा करपे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, ठाणेदार जगदीश गायकवाड, चौंडेश्वरी माता उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पात्रे, कमेटीचे अध्यक्ष प्रेमरतन दम्माणी, एकानंद समरीत, शाम डेकाटे, रमेश गोन्नाडे, जयपाल गायधने, बाळू बारई, किशोर पात्रे, शिवशंकर गभणे उपस्थित होते.