शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांचा विकास ठप्प

By admin | Updated: November 16, 2016 00:44 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे.

शेती झाली महाग : ग्रामीण भागातही यंत्राने धान कापणी, महिला शेतमजूरांची कामासाठी भटकंतीजवाहरनगर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे. मग शेतकरी कसा मागे राहणार. तो ही पुढे सरसावला व अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून शेती करू लागला. त्याचा त्यांना फायदाही झाला. परंतु निसर्गाची साथ तसेच शासनाची मदत न मिळाल्याने त्याचा विकास ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.पूर्वी मनुष्यबळाचा, बैलांचा वापर करून शेतातील वखरणी, नांगरणीपासून धान कापणीपर्यंत कामे होत होती. यात शेतकरी, महिला शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या दणकट होता. त्यासोबत योग्य प्रमाणात गाय-बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत होते. परंतु तंत्रज्ञानाचा विकास होत गेला व नवनवीन शेतीपूरक साधने तयार होऊ लागली. यात ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन ही तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची झाली आहेत. शेतकऱ्यांची दुसरी पिढी तंत्रज्ञानाच्या उपयोेग करीत कमी कष्टाळू झाली. पूर्वी बैलांच्या मदतीने शेताची वखरणी करण्यासाठी सहा सात दिवस लागायचे. शेताच्या कामावर असणारा पहाटेच शेतात जाऊन वखर जुंपायचा. माळरानावरून शेतकऱ्याची पत्नी हाक मारीत ‘अवं धनी, चटनी भाकर खायला या हो’ अशी सकाळी १०-११ च्या दरम्या आवाज शेतारानात घोंगायचा. आणलेली शिदोरी आपल्या बायकोसोबत सकाळची न्याहारी करायचा. यावेळी बैलालाही थोडा वेळ विश्रांती देऊन त्याला चारापाणी दिला जायचा. त्यानंतर पुन्हा कामाला लागायचे. दुपारी सूर्य डोक्यावर आला की वखर मांडवात आणून थोडा वेळ विश्रांती घ्यायचा. सायंकाळी परत ४ वाजेपासून त्याचे वखरणीचे काम सुरु व्हायचे तर पेरणी करण्यासाठी महिला मजुरांची शेताबांधाकडे एकच गर्दी दिसायची. नवनवीन कौटुंबिक गाणी कानावर पडायचे. दिवाळी झाली की पुन्हा गर्दीचा लोंढा शेता बांधावर दिसायचा. चरचर अशा उभ्या धान पिकाचा कापणीचा आवाज धान व विळा दरम्यान ऐकू यावयाचा. परंतु ते चित्र आज दिसेनासे झाले आहे. आज सामान्यातला सामान्य शेतकरी देखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी कापणी करण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे पैशाची तसेच वेळेचीही बचत होत असली तरी बैलजोडीचा अभाव व शेतमजुरांची कमतरता हे सुद्धा कारण यांना कारणीभूत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे बळकट राहले नाही. वा वयमान घटत आहे. वखरणी झाल्यानंतर पेरणी, निंदन, खुरपणी, कीटकनाशकाची फवारणी व कापणी ही सर्व आता मशीनच्या सहाय्याने होऊ लागली आहे. शेतारानात चिमण्या पाखरांचा घोंगावणारा आवाज यंत्रणाच्या आवाजात दबलेला आहे. माळरानातून शेतकऱ्याच्या पत्नीचे गाणे नाहीसे झाले. एवढे सर्व करूनही शेतकऱ्यांचा विकास पूर्वीप्रमाणे होऊ शकला नाही. खताचा वारेमाप तणनाशक जळणे यामुळे जमिनीची सुपिकता नाहिशी झाली. परिणामी निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली आहे. यातच शासनाचे दुर्लक्ष व शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्वीच्या परिस्थितीत होता. आजही त्याच अवस्थेत दिसून येत आहे. (वार्ताहर)