उत्साहाला वय नसते ; शिवजयंतीनिमित्त ज्येष्ठांची रंगली कबड्डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 02:39 PM2019-02-20T14:39:29+5:302019-02-20T14:40:13+5:30

उत्साहाच्या आड वय कधीच येत नसते याची प्रचिती जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत मंगळवारी उपस्थितांना आली.

The enthusiast does not have the age; Senior Kabaddi kabaddi for Shiv Jayanti | उत्साहाला वय नसते ; शिवजयंतीनिमित्त ज्येष्ठांची रंगली कबड्डी

(छाया - मुखरु बागडे-पालांदूर)

googlenewsNext
ठळक मुद्देउत्स्फूर्तपणे घेतला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: उत्साहाच्या आड वय कधीच येत नसते याची प्रचिती जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत मंगळवारी उपस्थितांना आली.
शिवजयंतीनिमित्त लाखनी तालुक्यातील मरेगाव येथे कबड्डीची स्पर्धा आयोजित होती. तरुण कबड्डीचे डाव टाकत होते. कधीकाळी याच मातीत कबड्डीचा डाव टाकलेल्या ज्येष्ठांनाही राहावले नाही आणि या वयातही त्यांनी कबड्डी - कबड्डी म्हणत खेळात भाग घेतला. ज्येष्ठांच्या अंगातील स्फूर्ती तरुणांनाही लाजविणारी होती. त्यांचा खेळ पाहण्यासाठी मग गावकरीही हातातील कामांना घटकाभर विसावा देऊन सरसावून बसले.
 

Web Title: The enthusiast does not have the age; Senior Kabaddi kabaddi for Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी