सहकारी संस्थांचे सक्षमीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:20 AM2019-08-28T01:20:58+5:302019-08-28T01:21:45+5:30

सहकार विभागाच्या वतीने भंडारा जिल्हयात अटल महापणन विकास अभियानांतर्गत लोकसंवाद जनजागृती मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित लोकसंवाद मोहिमेचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचे हस्ते झाले.

Empowerment of Co-operatives required | सहकारी संस्थांचे सक्षमीकरण आवश्यक

सहकारी संस्थांचे सक्षमीकरण आवश्यक

Next
ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधकांची माहिती : जिल्ह्यात लोकसंवाद जागृती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून जिल्हयामध्ये सहकारी संस्था आधारभूत धान खरेदी केंद्र चालविणे, बारदाना खरेदी विक्री, बि-बियाणे व रासायनिक खते खरेदी विक्री करणे इत्यादी व्यवसाय केले जातात. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यातून १५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था- खरेदी विक्री संस्थांची निवड करण्यात आली आहे. सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हयात लोकसंवाद जागृती मोहिम राबविली जात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी दिली.
सहकार विभागाच्या वतीने भंडारा जिल्हयात अटल महापणन विकास अभियानांतर्गत लोकसंवाद जनजागृती मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित लोकसंवाद मोहिमेचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचे हस्ते झाले. अटल अर्थसहाय्य समितीचे सदस्य शिवराम गिºहेंपूंजे, पुर्ती अटल संस्थेचे अध्यक्ष धनश्याम खेडीकर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पालांदूरचे अध्यक्ष विजय कापसे, शेतकरी उत्पादन कंपनीचे संजय एकापूरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, खरेदी विक्री संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या बळकटीकरणासाठी जिल्हयात अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जवळपास ३५ प्रकारचे विविध व्यवसाय संस्था निवड करु शकतील. या द्वारे संस्थांचे व सभासदांचे सक्षमीकरण व बळकटीकरण होण्यास हातभार लागणार आहे. या व्यवसायाची जनजागृती व्हावी व ते सहकारी संस्थांपर्यंत पोहचावे या उद्देशाने लोकसंवाद जनजागृती मोहिम राबविण्यात येत असल्याचे देशकर यांनी सांगितले.
गतवर्षी ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी असे व्यवसाय करुन त्यांचे सभासदांना पिक कर्ज, मुदत कर्ज देवून उत्तम सेवा दिली व सदर व्यवसायातून नफा कमविला अशा संस्थांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.
त्यामध्ये प्रथम क्रमांक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सुकळी, द्वितीय क्रमांक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वडद व तृतीय क्रमांक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. गोंडउमरी या संस्थांना राज्यस्तरावर कार्यक्रम घेऊन, त्यांना पुरस्कार व रोख रक्कम अदा करण्यात आले. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पालांदूर या संस्थेने सभासदांना दिलेल्या सेवा व सुरु केलेल्या इतर व्यवसायात नफा मिळविल्याने राज्यस्तरावर यशोगाथा प्रसिध्द करण्यात आली.
अटल महापणन अभियान अंतर्गत निवड केलेल्या संस्थांनी पुढाकार घ्यावा हा या मागील मुख्य हेतू आहे. या अभियानात जिल्हयातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केले. शिवराम गिºहेंपुंजे, घनश्याम खेडीकर, संजय एकापूरे व विजय कापसे यांनी मार्गदर्शन केले. योजनेनुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी विविध व्यवसाय हाती घेवून, संस्थेच्या सभासदांना सेवा पुरवावी व संस्थेचे बळकटीकरण करावे, असे विचार मांडले. आभार एच.के. हटवार यांनी मानले.

संस्थांना १३ लाखांचा नफा
या अभियानाच्या माध्यमातून जिल्हयात १०५ संस्थांनी सामंजस्य करार केला असून १८ संस्थांनी प्रत्यक्ष व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायात २१ लाख ६८ हजार ४०० रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून ७ कोटी ४३ लाख ४३ हजार ७१० रुपयांची उलाढाल झाली आहे. या संस्थांना रक्कम रुपये १२ लाख ९० हजार ३४ निव्वळ नफा झाला.

Web Title: Empowerment of Co-operatives required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.