शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:28 AM

जिल्हाभरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना ११ ऐवजी सहा महिन्यांच्या पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बुधवारला कामबंद आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान : ११ महिन्यांच्या फेरनियुक्ती आदेशाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हाभरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना ११ ऐवजी सहा महिन्यांच्या पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बुधवारला कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य होईस्तोवर कामबंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाच्या भंडारा शाखेने घेतला आहे.आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्तांनी राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील पुनर्नियुक्तीचा आदेश केवळ सहा महिन्यांचे देण्यात यावे व पुनर्नियुक्ती आदेश देण्याकरिता कामावर आधारीत गुणानुक्रमाचा वापर करण्यात यावा, असे आदेश निर्गमीत केले आहे. हा प्रकार अनेक वर्षांापासून सेवा देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे बुधवारपासून जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे देऊन कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात सहाशे कंत्राटी कर्मचारी असून हे सगळे अधिकारी कर्मचारी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघटित होऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत.राज्यभरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघाच्यावतीने हे आंदोलन सुरू असून भंडारा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष दमयंती कातुरे, उपाध्यक्ष चंदू बारई, कोषाध्यक्ष विशाल वासनिक, भारती भांडारकर, आशिष मारवाडे, विकास गभणे, डॉ.श्रीकांत आंबेकर, राजकुमार लांजेवार, मिलींद लेदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ११ महिण्याचा पुनर्नियुक्ती आदेश देण्यात यावा, मार्क सिस्टम रद्द करण्यात यावी, कर्मचाºयांना समकक्ष पदावर (नियमित) समायोजन करण्यात यावे, समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी व कमचाऱ्यांनी, या निर्णयाच्या विरोधात पुकारलेल्या कामबंद आंदोलनाची दखल जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी आंदोलकांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन आंदोलकांनी निवेदन दिले.विविध संघटनांचा पाठिंबाया आंदोलनाला जिल्ह्यात विविध कार्यरत संघटनानी पाठिंबा दर्शविला आहे. त्यात मॅग्मो संघटनेचे डॉ.मधुकर कुंभारे, डॉ.शंकर कैकाडे यांन, मॅग्मो आयुर्वेदिक संघटनेचे डॉ.रमेश खंडाईत, डॉ.रवी कापगते यांनी, जिल्हा परिषद समन्वय कृती समितीचे कळंबे, मारबते, डोर्लीकर, बोरकर यांनी, औषध निर्माता संघटनेचे सचिन रिनाईत यांनी, बहुजन मुक्ती मोर्चाचे मंगेश खोब्रागडे, नरेश आचला, भाकपचे हिवराज उके, कास्ट्राईब संघटनेचे सुदामे यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला.