शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

मागण्यांसाठी कर्मचारी उतरले रस्त्यावर

By admin | Updated: April 21, 2016 00:29 IST

वारंवार समस्या कळवूनही दाद न मिळाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले.

शहर गाजले आंदोलनांनी : २६ पासून बेमुदत संप, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे धरणेभंडारा : वारंवार समस्या कळवूनही दाद न मिळाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले. यात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना तथा तलाठी, पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात धरणे दिले. या आंदोलनामुळे जनसामान्यांची कामे रेंगाळली. आंदोलनामुळे भंडारा शहर पुन्हा एकदा गजबजले. वारंवार समस्या कळवूनही दाद न मिळाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले. यात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना तथा तलाठी, पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात धरणे दिले. या आंदोलनामुळे जनसामान्यांची कामे रेंगाळली. आंदोलनामुळे भंडारा शहर पुन्हा एकदा गजबजले.तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलनभंडारा : राज्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज जिल्ह्यातील जवळपास १९० तलाठी व ३५ मंडळ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तलाठी साझ्यांची व महसूल मंडळाची पुनर्रचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालयाला भाडे देणे, सात बारा संगणकीकरण व ई फेरफार मधील अडचणी दूर करणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनीज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणे, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेतील २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्त वेतन योजनेबाबत निर्णय घेणे आदी मागण्यांचा समावेश आहे. तलाठी हे संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विविध विमा योजना, जातीचे प्रमाणपत्र, जलसंधारणाची कामे, रोजगार हमीची कामे यासह अन्य जबाबदाऱ्या पार पाडतात. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे.आंदोलनात विदर्भ पटवारी संघाचे जिल्हा सचिव जे.एच. गेडाम, जिल्हाध्यक्ष आर.एस. अल्लेवार, जी.बी. अंबुले, जे.एच. गेडाम, पी.व्ही. अहिर यांच्यासह जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. राज्य महसूल कर्मचाऱ्यांचे धरणेभंडारा : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु मागण्यांची दखल न घेतल्यामुळे संघटनेने १० मार्च पासून आंदोलन पुकारले आहे. या अंतर्गत १० मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. २२ मार्चला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला होता. १ एप्रिलला कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली होती. तर १२ एप्रिल रोजी लेखणी बंद आंदोलन पुकारून आज बुधवारी धरणे देण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिवशी म्हणजेच १ मे रोजी मुंबई येथे मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवून ४ हजार ६०० रुपये करण्यात यावा, महसूल विभागातील लिपीकाचे पदनाम बदलवून महसूल सहाय्यक असे पदनाम देण्यात यावे, महसूल विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत एकाच पदावर कार्यरत राहत असल्यामुळे त्यांच्या पाल्याला संबंधित खात्यात नोकरी देण्यात यावी, नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, विभागातील चालकांना विशेष भत्ता देण्यात यावा, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ले लक्षात घेता शिक्षेची तरतूद असणारा कायदा करण्यात यावा, महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, फौजदारी गुन्हे अंतर्गत प्रथम खात्याअंतर्गत चौकशी करण्यात यावी, गृहविभागाच्या धरतीवर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात, २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, तालुका, जिल्हास्तरीय कार्यालयासाठी पुरेशी जागा व सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात, वयाच्या ५३ वर्षानंतर कर्मचारी यांना त्यांच्या इच्छेनुसार नेमणूक देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आॅगस्ट २०१४ रोजी शासनासोबत झालेल्या चर्चेत काही मागण्या मंजुर करण्यात आल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. धरणे आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, एस.एस. साखरवाडे, संजय जांभुळकर, अतुल मेश्राम, मनोहर मेहर, आर.एम. भवसागर, एच.के. साठवणे यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)