लाखनी : तालुक्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली होती. पहिल्या प्रशिक्षणासाठी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. त्या कर्मचाऱ्यांना मतदानांचा अधिकार मिळाला. नियुक्ती पत्रासोबत त्यांना ईडीव्ही स्लीप मिळाली. परंतु ज्या कर्मचाऱ्यांची निवड दुसऱ्या प्रशिक्षणासाठी वेळेवर निवड करण्यात आली त्या कर्मचाऱ्यांना ईडीव्ही मिळाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्कापासून वंचित राहावे लागले. मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार होती. परंतु साकोली विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित राहावे लागत त्याकडे निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. दि. १७ पर्यंत कर्मचाऱ्यांना मतदान करावयाचे आहे. परंतु मतदानाचे बॅलेट न मिळाल्यामुळे अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
कर्मचारी मतदानापासून वंचित
By admin | Updated: October 16, 2014 23:20 IST