शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपातग्रस्तांचे बस्तान ‘टिन शेड’ मध्ये

By admin | Updated: May 29, 2015 00:56 IST

सिंदपुरी येथील आपदग्रस्त कुटूंबियांना घरकूल मंजुरीचा गुंता सुटता सुटेना झाला आहे.

रंजित चिचखेडे  चुल्हाड (सिहोरा)सिंदपुरी येथील आपदग्रस्त कुटूंबियांना घरकूल मंजुरीचा गुंता सुटता सुटेना झाला आहे. यंदा पावसाळ्यात टिनाचे शेडमधील वास्तव्य या कुटूंबियांना जिकरीचे ठरणार आहे. या शिवाय सुविधा आणि जागेअभावी शेतकऱ्यांचे जनावरे व त्यांच्या चाऱ्यापाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.टिनाचे शेडमध्ये ५२ कुटूंब वास्तव्य करीत आहे. हे कुटूंब गरिब आणि असहाय आहेत. या कुटूंबियांना शासकीय घरकूल मंजूर करण्यात येत असल्याचे तुणतुणे वाजविण्यात येत आहेत. या कुटूंबियाचे पुनर्वसन होणार नाही हे आधीच झाले आहे. यामुळे घरकुल मंजूर होणार असल्याने अपेक्षा वाढल्या आहे. व्हॉटस अप आणि इंटरनेटच्या जगात आपातग्रस्त कुटूंबियांची घरकुल मजुरीची फाईल मात्र संथ गतीने धावत आहे. यामुळे या कुटूंबियांना जलद गतीने न्याय मिळत नाही, ही खरी शोकांतिका आहे. गरिबांना हक्काचा आधार देताना जाचक अटी सांगितल्या जात आहे. त्रुट्या पुढे करुन फाईल तथा यादीचा प्रवास सुरु झाला आहे. अप-डाऊन सुरु झाल्याने फाईलचे लचके तोडली जात आहे. अंतिम मंजुरीपर्यंत पाने गहाळ झाल्याचा अनुभव गावकऱ्यांना येणार आहे. या कुटूंबियांची घरकुल मंजुरीची फाईल कुठे आहे. या संदर्भात जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी छातीठोकपणे सांगत नाही. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा राज्यशासन असा एकच सुर आहे. पंरतु तब्बल एक वर्ष पूर्ण होत असतांना आपातग्रस्तांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यात शासन आणि प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे.स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात टिनाचे शेड गेल्या वर्षात उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये आपातग्रस्त कुटूंब, मुले आणि जनावरे वास्तव करित आहेत. या शेडमध्ये तट्टे लावण्यात आली असून ही आता जिर्ण झाली आहे. तट्यांना मोठी छिद्र पडली आहेत. यामुळे वास्तव्य करणे अडचणीत येत आहे. स्वच्छतेचा पुरस्कारप्राप्त शाळेच्या प्रांगणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यात दोष आपातग्रस्त कुटूंबियांचा नाही. बहुतांश शेतकरी असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यात मात्र त्यांचे शाळेकरी मुले संकटाचा सामना करित आहेत. या शेडनजीक मोठा तलाव आहे. पावसाळयात तलाव पाण्याने तुडूंब भरला राहत असून, अन्य जागेत खातकुडे आहेत. यामुळे कुटूंबियात भिती निर्माण झाली आहे. साप व विंचवाचे सामना या कुटूबिंयाना करावे लागणार आहे. मायबाप शासनाला या संदर्भात भयभित कुटूंबियानी अनेक पत्रव्यवहार केली आहेत. हिवाळी अधिवेशनात आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. परंतु या पत्राचे साधे समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. यामुळे घरकुलांचा प्रश्न सुटणार किंवा नाही, असा साशंक प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आश्वासनाची रिघ लावली आहे. पंरतु हीच हवा 'कॅश' करण्यास विरोधक मात्र मागे पडली आहेत. गावकरी व त्यांचे कुटूंब टिनाच्या शेडमध्ये वास्तव्य करित असले तरी कडक उन्हळ्यात पारा चढला असल्याने, त्याची चांगलीच लाहीलाही होत आहे. यामुळे झाडांचा आश्रय घेण्यात येत आहे. वातानुकूलीत खोलीत बसून प्रशासकीय यंत्रणा मात्र या कुटूंबियांचा तमाशा पाहत आहे. संवेदनाच बोथट झाल्याचा अनुभव आपातग्रस्त कुटूंब घेत असले तरी यंदाचा पावसाळा या कुटूंबियाना आव्हानात्मक ठरणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी तथा आचार संहितेची अडचण या कुटूंबियांना घरकुल प्राप्त होवू देणार नाही. हे आता सत्य ठरणार आहे.